या प्रजातीत माणसाचे मृतदेह नातेवाईकांना खावे लागते अन् नाही खाल्ले तर…

 

 

जगभरात अशा अनेक प्रजाती आहेत, ज्यांच्या पंरपरा, संस्कृती सर्वसामान्य लोकांना धक्का देणाऱ्या आहे. आपल्याला आजही काही लोकांच्या संस्कृती, परंपरांबाबत माहीत नाहीये. काही आदीवासींच्या परंपरा तर अशा आहेत की त्यावर आपला विश्वास बसणेही कठीण आहे.

आज आपण अशाच एका आदिवासी समाजातील लोकांबद्दल जाणू घेणार आहोत, ज्यांच्या रुढी-परंपरा सामान्य माणसाच्या कल्पना शक्तीच्या बाहेर आहे. साऊथ आफ्रिकेमध्ये राहणाऱ्या या प्रजातीचे नाव यानोमामी जनजाती आहे. या प्रजातीला जेकी यनम किंवा सीनेमा म्हणूनही ओळखले जाते.

ही आदीवासी प्रजाती आजच्या आधूनिकीकरण आणि पश्चिमाकरण यावर विश्वास ठेवत नाही. ही प्रजाती फक्त त्यांच्या संस्कृतीनुसार आणि परंपरेनुसार वागत असते. त्यांच्या रुढी परंपरा ते पालन करताना दिसतात.

या प्रजातीत अंत्यसंस्कार करण्याची पद्धत पण खुप वेगळी आहे. त्यांच्या या परंपरेला एंडो-केनिबलवाद म्हणून ओळखले जाते. त्यांच्या प्रजातीतील माणसाचा मृत्यु झाल्यानंतर त्याचे मांस खाण्याची ही आगळीवेगळी प्रथा आहे.

अजेमन वर्षावमध्ये राहणाऱ्या यानोमामी प्रजातीच्या म्हणण्यानुसार, माणसाच्या मृत्युनंतर शरीरातील आत्म्याला सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे. तसेच माणसाच्या आत्म्याला तेव्हाच शांती मिळू शकते, जेव्हा त्याच्या शरीराला जाळून, त्याच्या नातेवाईकांना ते खायला दिले जाईल.

काही प्रजातींमध्ये माणसाचा अंत्यसंस्कार करताना त्याचे शरीर दफन केले जाते, पण ही प्रजाती शरीराला जाळून त्या शरीरावर हसत हसत पेंट केले करते आणि ते मांस नातेवाईकांना खायला दिले जाते. नातेवाईक त्यावेळी गाणे गाऊन आणि रडून आपले दु:ख व्यक्त करत असतात.

महत्वाच्या बातम्या-

कोरोना रुग्णांना टरबूजातून खर्रा आणि पार्सलमधून दिली जातेय दारू; नातेवाईकांचा प्रताप

देशात कोरोनाचा उद्रेक! एका दिवसात दोन लाख रुग्णांची विक्रमी वाढ, देशात पुन्हा लॉकडाऊन?

माधूरी दिक्षित आणि नोरा फतेहीचा सोशल मिडीयावर धुमाकूळ; दोघींचा डान्स व्हिडीओ व्हायरल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.