एका परदेशी अभिनेत्रीला केवळ ‘या’ गाण्यामुळे भारतीयांनी डोक्यावर घेतले होते; रातोरात झाली होती फेमस

‘स्वप्न नगरी’ म्हणून सध्या बॉलीवूड म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टी ओळखली जाते. मग ते सिनेमा असो किवां नाटक असो किवा सीरिअल्स  असो लाखो लोक या चित्रपट सृष्टीत सुपरस्टार बनण्याचे स्वप्न बघत असतात. अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्ध कलाकार आपल्यला पाहायला मिळतात.

अनेक कलाकार आपल स्वप्न पूर्ण करण्यासाठी या स्वप्न नगरीत येतात. त्यातील अनेक कलाकारांनी आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर सोडली. आणि या भूमिका अजरामर त्यांच्या भूमिका झाल्या. परतू आपल्या असेही काही कलाकार पाहायला मिळतात की ज्यांच्या अभिनयाची सुरुवात जोश्यात सुरु झाली पण कालांतराने हे कलाकार मागे पडले.

आज आपण अश्याच एका अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत जी मुळची भारतीय नव्हती. ‘बाबूजी जरा धीरे चलो’ हे गाणे प्रचंड गाजले होते. या गाण्यात झळकलेली अभिनेत्री ‘याना गुप्ता’ आजही प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात आहे. यांना हिने बॉलिवूड मध्ये एका म्युझिक अल्बम द्वारे पदार्पण केले.

‘बाबूजी जरा धीरे चलो’ हे तीच गाणं खूपच सुपरहिट झाल. या गाण्यात तिने म्हशीवर बसून एन्ट्री घेतली होती. तिचा डान्स जबरदस्त हिट झाला होता. परंतु त्यानंतर ती प्रेक्षकांच्या मनावर राज्य करू शकली नाही. याना हिने अनेक चित्रपटात देखील काम केले.

२०११ पासून ती चित्रपट सृष्टीपासून दूर गेली. मर्डर २ हा तिचा शेवटचा चित्रपट ठरला त्यानंतर ती चित्रपट सृष्टीपासून लांब राहिली. याना ही मुळची ब्रनोतील असून तिने सोळाव्या वर्षी तिच्या मॉडलिंग कारकिर्दीला सुरुवात केली. जपानमध्ये देखील ती मॉडलिंग करत होती. त्यानंतर काही वर्षांनी ती भारतात आली.

भारतात आल्यानंतर सुरवातीच्या काळात ती पुण्यातील ओशो आश्रमात राहत होती. त्यानंतर तिचे थोड्याच दिवसात सत्यक गुप्तासोबत ओळख जाली आणि त्यांनी २००१ मध्ये लग्न केले. परंतु त्यांचे लग्न जास्त काळ टिकू शकले नाही. लग्नाच्या काहीच वर्षांत म्हणजेच २००५ मध्ये त्या दोघांचा घटस्फोट झाला.

अभिनयाची आवड असल्याने तिने २००१ मध्ये मॉडलिंग करायला सुरुवात केली. तिला लॅकमेसारख्या प्रसिद्ध ब्रँडसाठी मॉडलिंग करण्याची संधी देखील मिळाली. त्यानंतर ‘दम’ या चित्रपटातून तिने बॉलीवूड मध्ये एन्ट्री केली. याच चित्रपटातील ‘बाबूजी जरा धीरे चलो’ या गाण्याने ती प्रसिद्ध झाली.

तिने काही वर्षांपूर्वी हाऊ टू लव्ह युअर बॉडी अँड गेट द बॉडी यू लव्ह हे पुस्तक देखील लिहिले होते. परंतु कालांतराने ती चित्रपट सृष्टीपासून दूर गेली.

हे ही वाचा-

मोठा खुलासा! प्रयोगशाळेत आणखी घातक व्हायरस बनवतंय चीन, कोरोनासुद्धा चीननेच बनवला

एकेकाळी घरोघरी जाऊन सायकलवर विकले सामान, आज आहे ५ हजार ५२४ कोटींचा मालक

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.