‘या’ दोन प्रसिद्ध मालिकांच्या सेटवर कोरोनाचा शिरकाव; शूटींगही केले रद्द

मुंबई | महाराष्ट्रात कोरोनाने हाहाकार माजविला आहे. आणि आता कोरोनाने टीव्ही इंडस्ट्रीमध्येही शिरकाव केला आहे. शूटींगमध्ये असलेल्या लोकांना या व्हायरसची लागण झाल्याने दोन मालिकांची शूटींग थांबवण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ‘मेरे साई’ मालिकेच्या शूटिंगच्या सेटवर कोरोना व्हायरसची पहिली केस समोर आली आहे. सेटवरिल एका कर्मचाऱ्याला अस्वस्थ वाटत असल्याने, त्या कर्मचाऱ्याने कोरोना टेस्ट केल्यानंतर त्याचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे.

३ जुलैपासून त्या कर्मचा-याने सेटवर येणे बंद केले होते. तेव्हापासून या मालिकेची शूटींग बंद आहे. या मालिकेतील सगळे कलाकार आणि टेक्निशियन क्वारंटाईन आहेत.

त्यानंतर सगळ्यांची कोरोना टेस्ट करुन घेतली आहे. यामध्ये ज्यांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत त्यांच्यासोबत ‘मेरे साई’ मालिकेचं शूटींग सुरु केले जाणार आहे.

दरम्यान, आणखी एका मालिकेच्या सेटवर कलाकाराला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. ‘डॉ. बी.आर. आंबेडकर एक महानायक’ या मालिकेतील मुख्य कलाकाराची कोविड-१९ टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे.

या मालिकेच्या सेटवरही हे कळाल्यानंतर सगळ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या मालिकेची शूटींग गेले दोन दिवस बंद आहे.

या मालिकेत बाबासाहेबांच्या वडिलांची भूमिका साकारणारे अभिनेते जग्गनाथ निवंगुणे यांना कोरोनाची लागण झाली आहे. संपूर्ण काळजी घेऊनही सेटवर कोरोनाचा शिरकाव झाल्याने सगळेजण काळजीत आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.