Homeमनोरंजनबिग बॉसमध्ये भाग घेणाऱ्या 'या' स्पर्धकांना सलमानशी पंगा घेणे पडले महागात, एका...

बिग बॉसमध्ये भाग घेणाऱ्या ‘या’ स्पर्धकांना सलमानशी पंगा घेणे पडले महागात, एका क्षणात संपले करीअर

‘बिग बॉस शो’ ही सर्वात लोकप्रिय आणि वादग्रस्त मालिका आहे. बिग बॉसचा होस्ट सलमान खान देखील वादात राहतो. सलमान खानवर अनेकवेळा पक्षपाताचे आरोप झाले आहेत. शो दरम्यान बिग बॉसच्या स्पर्धकांचा सलमान खानसोबत थेट वादही होताना दिसतो. मात्र,तितकाच हा शो प्रसिद्ध देखील आहे. ‘बिग बॉस’ ची मालिका पाहिल्यावर निदर्शनास आले कि,सलमान खानने अनेक स्पर्धकांच्या जिंदगीमध्ये चारचाँद लावले तर काहींची जिंदगी पूर्णच खराब केली.

बिग बॉसच्या ११ व्या सीझनमध्ये स्पर्धक म्हणून झुबेर खानने प्रवेश केला होता. बिग बॉसच्या घरात प्रवेश करताच झुबेर खानने घरातील सदस्यांसोबत अपशब्द वापरण्यास सुरुवात केली. इतर बिग बॉसच्या स्पर्धकांना तो धमक्या देऊ लागला.एवढेच नाही तर, झुबेर खाननेही होस्ट सलमान खानसाठी अनेक अपशब्द वापरले होते. त्यामुळे या सीझनच्या सुरुवातीलाच हि मालिका अधिक चर्चेत येऊ लागली.

यावेळी, स्पर्धक झुबेर खानने बिग बॉसच्या घरातच झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. वीकेंडच्या वारला सलमान खान आला तेव्हा त्याने झुबेर खानचा क्लास सुरू केला. तसेच सलमान खानने झुबेरला सर्वांसमोर सांगितले होते की, तुला तुझी औकात दाखवायची आहे का? सलमान झुबेरला बाहेर येऊन तुझी हिम्मत दाखव म्हणाला. तसेच, देवाची शपथ, तुला कुत्रा नाही बनवला तर माझे नावही सलमान नाही,असे म्हणाला.

तर, बिग बॉस शोच्या १० व्या सीझनमध्ये काही सामान्य व्यक्तींनी देखील भाग घेतला होता. बिग बॉसच्या या सीझनमध्ये प्रियांका जग्गा देखील स्पर्धक म्हणून दिसली होती. प्रियांका जग्गा यादरम्यान खूप चर्चेत आली होती. बिग बॉसमध्ये प्रियंका जग्गानेही घरातील सदस्यांशी गैरवर्तन केले होते. तसेच बिग बॉसच्या पहिल्या आठवड्यात प्रियांका जग्गा हिचा होस्ट सलमान खानसोबत वादही झाला होता. यानंतर प्रियांकाला होस्ट सलमान खाननेही इशारा दिला होता.

‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ या शोमधून अभिनेता आकाशदीप सहगलने खूप लोकप्रियता मिळवली. आकाशदीप सहगल बिग बॉस ५ च्या शोमध्ये सहभागी झाला होता. शोमध्ये आकाशदीपचे घरातील सदस्यांशीच नव्हे तर सलमान खानसोबतही खूप भांडण झाले होते. आकाशदीप सहगलने सलमान खानवर आरोप केला होता की, ‘त्याने नेहमीच आपल्या प्रतिस्पर्ध्याला शोमध्ये पाठिंबा दिला आहे,आणि त्याला इतर स्पर्धांकांपुढे अपमानित केले आहे.’

‘बिग बॉसचा शो सोडल्यानंतर आकाशदीप सहगल टीव्ही शो ‘शेर-ए-पंजाब: महाराणा रणजीत सिंह’ मध्ये दिसला होता. या शोमध्ये तो एका छोट्या भूमिकेत दिसला होता. त्यानंतर आकाशदीपला इंडस्ट्रीत काम मिळू शकले नाही. अभिनेता आकाशदीप सहगलने बिग बॉसचा होस्ट सलमान खानवर त्याचे करिअर बरबाद केल्याचा आरोप केला आहे. बिग बॉस ५ शो मध्ये अभिनेता सिद्धार्थ भारद्वाज देखील दिसला होता. सलमान खान आणि त्याच्यामध्ये देखील भांडण झाले होते. त्यांनतर, २०१४ पासून सिद्धार्थ कुठेच दिसला नाही.
महत्वाच्या बातम्या 

ओला इलेक्ट्रिक स्कुटर घेऊन पचतावलेत ग्राहक, येत आहेत तक्रारी, कंपनीने दिले ‘हे’ स्पष्टीकरण
विराट खोटं बोलला? कर्णधारपदाच्या वादावर चीफ सिलेक्टरने केला खुलासा, म्हणाले, विराटला..
मला ठग म्हणू नका, जॅकलीन आणि मी…; २०० कोटी मनी लाँड्रींग प्रकरणात सुकेशचे जॅकलीनवर गंभीर आरोप