टिकटॉक बंदीमुळे भडकल्या ‘या’ महिला खासदार; मोदी सरकारवरच केला प्रश्नांचा भडिमार

मुंबई | सध्या सीमेवर भारतीय जवान चीनशी लढा देत आहेत. या लढ्यात आपले अनेक जवान शहीद झाले आहेत.

या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोठा निर्णय घेतला आहे. भारताने चीनचे तब्बल ५९ चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. यामध्ये टिकटॉक, स्नॅपचॅट आणि हॅलो यासारख्या अनेक प्रसिद्ध अॅप्सचा समावेश आहे.

भारत सरकारच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. तर दुसरीकडे टीएमसीच्या (TMC) खासदार  नुसरत जहां यांनी टिकटॉक बंदीवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

नुसरत जहां यांनी भारत सरकारच्या टिकटॉक बंदीच्या निर्णयाला ‘घाईत घेतलेला निर्णय’ म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, टिकटॉक माझ्यासाठी इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसारखे आहे.

परंतु, माझा प्रश्न असा आहे की, आपण अचानक हा निर्णय घेतल्यास काय होईल? फक्त अ‍ॅप बंद केल्याने काय होईल? इतकेच नव्हे तर अ‍ॅपवर बंदी घालण्याची तुलना यांनी नोटाबंदीशी केली आहे.

पुढे त्यांनी असेही सांगितले की, सरकारच्या या निर्णयानंतर बर्‍याच लोकांना नोकर्‍या गमवाव्या लागतील. त्यांचे काय होईल? देशाच्या सुरक्षेच्या हितासाठी मी सरकारसमवेत आहे.

मात्र, सैन्यासाठी वापरण्यात येणार्‍या बुलेट प्रूफ जॅकेट्स चीनकडून मागवल्या जातात. झोपेतून उठून नोटबंदी केली, अचानक अ‍ॅप बंद केले. यामुळे काय होईल? याचे उत्तर कोण देईल?

टीएमसीच्या खासदार आणि बंगाली सिनेमाची प्रसिद्ध अभिनेत्री नुसरत जहां टिकटॉकवर बऱ्याच सक्रिय होत्या. सातत्याने त्या टीकटॉकवर आपले व्हिडीओ पोस्ट करत असत. त्यांचे फॉलोअर्सही मोठ्या संख्येने होते.

कोलकाता येथे इस्कॉनने आयोजित केलेल्या कार्यक्रमात नुसरत जहां गेल्या होत्या. तेथे त्यांनी टिकटॉक बंदीवर प्रतिक्रिया व्यक्त केली होती.

अभिनेत्री नुसरत जहां यांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.