Share

IPL मधील ‘या’ कर्णधाराने जिंकले सेहवागचे मन, म्हणाला, ‘तो अत्यंत शांत आणि संयमी निर्णय घेतो’

virendra sehwag

भारताचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवाग याने यंदाच्या हंगामातील त्याचा आवडता कर्णधार कोण? या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. गुजरात टायटन्स चा कर्णधार हार्दिक पांड्याच आवडता कर्णधार असल्याचे सेहवागनं  सांगितले आहे. आयपीएल २०२२ मध्ये गुजरात टायटन्स हा सर्वात यशस्वी संघ आहे.

आज गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल यांच्यामध्ये कॉलिफायर १ रंगणार आहे.  क्वालिफायर १मध्ये विजय मिळवणारा संघ थेट अंतिम सामना खेळण्यास पात्र ठरेल. पराभूत होणारा संघ एलिमिनेटर सामन्यातील विजेत्या संघासोबत क्वालिफायरचा दुसरा सामना खेळेल.

हार्दिकचा संघ मैदानात उतरण्यापूर्वी हार्दिकच्या नेतृत्वाचं कौतुक भारताचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवाग याने केले आहे. “हार्दिक कर्णधार म्हणून निर्णय घेताना  शांत डोक्याने विचार करूण निर्णय घेतो. एक आक्रमक फलंदाज असूनही कर्णधार म्हणून अत्यंत शांत आणि संयमी असे निर्णय घेतो. तो दबावात असताना  योग्य वेळी योग्य निर्णय घेतो.” असे सेहवागने सांगितले आहे.

आयपीएल २०२२ मध्ये हार्दिक एक उत्तम कर्णधार म्हणून खेळत आहे. खेळाडू म्हणूनही हार्दिकची चांगली कामगिरी  राहिली आहे. गुजरात टायटन्स कडून खेळताना हार्दिकने १३ सामन्यात ४१३ धावा केल्या आहेत. यावेळी त्याची सरासरी ४१.३० इतकी होती.

हार्दिक एक फलंदाज आणि कर्णधार म्हणून आयपीएल २०२२ मध्ये कामगिरी चांगली  झाली आहे. हार्दिकचा  स्ट्राइक रेट १३२.५२  आहे. यावेळी त्याने ४ अर्धशतकं ठोकली असून ८७ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. तो उत्तमप्रकारे गोलंदाजी देखील करत आहे.

दरम्यान आता आयपीएलच्या अंतिम सामन्याला काही दिवस शिल्लक असताना सर्व खेळाडूंच्या खेळावर एक प्रकारचं फिडबॅक क्रिकेट जगतातून उमटतना पहायला मिळत आहे. स्पर्धेतील प्लेऑफचे सामने आजपासून सुरु होत आहेत.

महत्वांच्या बातम्या:-
अरे वा! आता whats app वरून डाऊनलोड करता येणार पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसेन्स आणि बरंच काही..
बापाच्या अपमानाचा बदला पोरांनी घेतला; एकाने IPL गाजवली तर दुसऱ्याने तेंडूलकरला घरी बसवले
राणी व्हिक्टोरियासोबत ‘या’ भारतीयाचं होतं अफेअर, राजघराण्याला कळताच उडाली होती खळबळ

खेळ ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now