‘तू चूकीच्या माणसाशी पंगा घेतला, तुझे करीअर संपवल्याशिवाय राहणार नाही’; सलमानला धमकी

अभिनेता सलमान खान अनेक सुपरहिट चित्रपट करतो. तसेच अनेकांना तो कामही देतो. त्याच्याशी शक्यतो कोण पंगा घेत नाही. पण, यावेळी मात्र एका अभिनेत्याने सलमानलाच धमकी दिली आहे. यामुळे आता आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

तो म्हणतो की, सलमान तू भलेही बाॅलिवुडचा गुंड असशील, पण यावेळी तू चुकीच्या माणसाशी पंगा घेतला आहेस. तुझे करिअर संपविल्याशिवाय मी शांत बसणार नाही. बॉलीवूडच्या भाईला धमकी दिल्यामुळे ही चर्चा सोशल मीडियावर चांगलाच रंगली आहे.

अभिनेता कमाल आर खान केआरके हा नेहमीच आपल्या भूमिकांमुळे सोशल मीडियामध्ये चर्चेत असतो. आता पुन्हा एकदा तो चर्चेत आला आहे. तो म्हणाला, बाॅलिवुडचा गुंड भाई तू, एक लक्षात ठेव मी भलेही आऊटसायडर आहे. पण, मी सुशांत सिंह राजपूत नाही. ना आत्महत्या करणार आहे ना मी बाॅलिवुडला जिंकू देणार. यावेळी तुम्ही चुकीच्या माणसाशी पंगा घेतला आहे.

आम्ही उत्तरप्रदेशचे आहोत, हार कधीच मानत नाही. आता तर आरपारची लढाई होईल. बाॅलिवुडच्या इतिहासात या लढाईचा उल्लेख केला जाईल. मी तुमच्या आव्हानांचा स्वीकार करतोय, असे बोलत केआरके आव्हान देखील स्वीकारले आहे.

तो राजकारणी, बाॅलिवुडमधील सेलेब्रिटिंवर सतत टीका करत असतो. केआरके विरोधात अनेक सेलेब्रिटींनी मानहानीचे दावे ठाकले आहेत. पण, केआरके मागे सरलेला नाही. तो म्हणतो की, तुम्हाला जे करायचे ते करा, तुमची संपूर्ण ताकद पणाला लावा, पण तुम्ही मला हरवू शकणार नाही.

आता सलमान खान काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र हे प्रकरण आता चांगलेच तापले आहे. यामुळे बॉलीवूड आणि चाहत्यांमध्ये चर्चा रंगू लागली आहे.

ताज्या बातम्या

‘शोले’ चित्रपटातील गब्बरचा लुक रमेश सिप्पीने नाही तर आमजद खानने केला होता डिझाइन

मोठी बातमी! इलेक्ट्रिक दुचाकी होणार स्वस्त, मोदी सरकारने अनुदानाची रक्कम वाढवली

‘या’ इलेक्ट्रिक कार्स एकदा चार्ज केल्यावर धावतात ४०० किलोमीटरपेक्षा जास्त, वाचा फीचर्स आणि किंमत

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.