जास्तीची हाव न ठेवता ‘चंद्र आहे साक्षीला’ मालिका झाली बंद; जाणून घ्या त्यामागचे कारण

सध्याच्या  कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मनोरंजन क्षेत्रावर परिणाम झालेला दिसून येतो. त्यात मराठी मनोरंजन क्षेत्रातील अनेक कार्यक्रमांचे शुटींग थांबवण्यात आलेले दिसून येते. कोरोनाचा महाराष्ट्रातील प्रादुर्भाव लक्षात घेता मनोरंजन क्षेत्रातील अनेक दिग्दर्शकांनी  दुसऱ्या राज्यात जाऊन शुटींग करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच अनेक दिग्दर्शकांनी आटोपत घेऊन मालिकांचा शेवट केला आहे.

सध्याच्या मालिका पाहिल्या तर आपल्याला असं लक्षात येईल की, मालिकांचा  विषय पार ओढून ताढुन दाखवला जातो. प्रेक्षकांनाअक्षरशः कंटाळा  येतो पाहायला, तर दुसरीकडे काही मालिका थोडक्यात आपला विषय मांडून मोकळ्या होतात. त्यातीलच एक मालिका म्हणजे ‘ चंद्र आहे साक्षीला ‘

कलर्स मराठी वाहिनीवरील चंद्र आहे साक्षीला ही मालिका गेल्या वर्षी लॉकडाउन काळात प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी आली आणि अल्पावधी काळातच निरोप घेतला. चिन्मय मांडलेकर या कलाकाराचे कथानक असलेली ही मालिका गेल्या वर्षी ११ नोव्हेंबर २०२० रोजी सुरु झाली आणि १७ एप्रिल २०२१ रोजी संपली. अत्यंत मोजक्या भागात दाखवलेल्या या मालिकेने चाहत्यांच्या मनात घर केले.

या मालिकेत रोज काही न काही नवं इंटरेस्टिंग घटना घडत होती. यामुळे चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आवड निर्माण होत होती. साधारण पाच महिन्यांच्या कालावधीत या मालिकेने प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळवले होते. या मालिकेत अत्यंत मोजके आणि दिग्ज कलाकार होते. सुबोध भावे, आस्ताद काळे, ऋतुजा बागवे, उमा सरदेशमुख, नक्षत्रा मेढेकर यांच्या सहजसुंदर अभिनयाने ही मालिका अधिकच रंगत गेली होती.

सध्या बऱ्याच मालिकांमध्ये टीआरपी वाढवण्याच्या नादात मालिकांचा विषय  उगाचच भरकटवला जातो. परंतु अशी भरकटलेली किवा खात पाणी घातलेली मालिका प्रेक्षकांच्या मनातून उतरते आणि पाहावीशी वाटत नाही. चंद्र आहे साक्षीला ही मालिका या गोष्टीला अपवाद ठरली.

या मालिकेचे कथानक चिन्मय मांडलेकर यांनी कुठलेही खात पाणी न घालता अत्यंत सरळ, सोप्या आणि इंटरेस्टिंग घटना प्रक्षकांना दाखवली. प्रेक्षकांनीही न विसरता या गोष्टीचे कौतुक केलेले दिसून येते. खरतर चिन्मय मांडलेकर म्हंटल की विषय जरा वेगळाच येतो. एक उत्तम लेखक, अभिनेता आणि दिग्दर्शक त्याच बरोबर हटके कलाकार म्हणून ओळख आहे.

चंद्र आहे साक्षीला या मालिकेत अनेक वेगळ्या गोष्टी ही घडल्या. म्हणजे मधल्या काळात सुबोधचे म्हणजेच तो श्रीधरची भूमिका साकारत असलेल्या व्यक्तिरेखेचे वागणे प्रेक्षकांना खटकलेले दिसले मात्र त्यानंतर हळूहळू या कथेचा उलगडा होत गेला तशी मालिका अधिकच खुलत गेलेली दिसली. त्याचबरोबर मूळ कथेची लांबी न वाढवता ती आटोपती घेतली या गोष्टीने प्रेक्षकांची मने जिंकली.

हे ही वाचा –

आला उन्हाळा, तब्येत सांभाळा;. जाणून घ्या उन्हाळ्यात घ्यावयाची खबरदारी

कपिल शर्मा संपत्तीच्या बाबतीत बॉलीवूड कलाकारांना टाकतो मागे; जाणून घ्या एकूण आकडा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.