Share

‘कलम ३७० मुस्लिम द्वेषातूनच हटवले, भारतीय लोकांच्या जीवनात त्यामुळे काहीच फरक पडला नाही’

काल १६व्या विद्रोही साहित्य संमेलनाची सांगता झाली. लातूर(Latur) जिल्ह्यातील उदगीर या ठिकाणी हे विद्रोही साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. या साहित्य संमेलनाला देशातील अनेक दिग्गज साहित्यिक, कलाकार हजर होते. या विद्रोही साहित्य संमेलनाला प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे देखील उपस्थित होते.(writer ashok kumar pande statement on kashmir article 370)

यावेळी इतिहास अभ्यासक आणि लेखक डॉ. अशोककुमार पांडे यांनी काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्यावरून मोदी सरकारवर टीका केली आहे. “कलम ३७० ही काश्मिरी लोकांची ओळख होती. ती पुसल्याने तेथील नागरिकांना किंवा इतर भारतीय लोकांना कोणताही फरक पडलेला नाही. कारण ते कलम हटवण्याचा निर्णय लोकशाही पद्धतीने झालेला नव्हता. तो मुस्लिम द्वेषातून घेतलेला निर्णय होता”, अशी टीका लेखक डॉ. अशोककुमार पांडे यांनी केली आहे.

१६व्या विद्रोही साहित्य संमेलनात इतिहास अभ्यासक आणि लेखक डॉ. अशोककुमार पांडे यांची विशेष मुलाखत घेण्यात आली. यावेळी लेखक डॉ. अशोककुमार पांडे यांनी काश्मीरमधील सध्य परिस्थितीवर भाष्य केलं. “काश्मीरची नागरी संस्कृती समजून घेतली तर आपल्याला लक्षात येते की, सध्या जे सुरु आहे ते मुस्लिमविरोधी राजकारणाचा भाग आहे.”

” हे वास्तव सगळ्यांना माहित आहे. पण दुसऱ्याचे घर जळताना पाहून आपल्याला आनंदात होत असतो किंवा त्याच्या आपला काही संबंध नाही, असे आपल्याला वाटते. काश्मीरबद्दल आपल्याला खरेच आपुलकी असती तर तेथे हत्याकांड सुरु असताना आपण कोठे होतो? काश्मीर भारतीय लोकांसाठी फक्त एक पर्यटनस्थळ आहे”, असे लेखक डॉ. अशोककुमार पांडे मुलाखतीत म्हणाले आहेत.

यावेळी इतिहास अभ्यासक आणि लेखक डॉ. अशोककुमार पांडे यांनी काश्मिरी पंडितांवरील अत्याचारावर आधारित असणाऱ्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटावर देखील निशाणा साधला आहे. या चित्रपटातून देशभरात मुस्लिमविरोधी वातावरण निर्माण करण्याचे काम सुरु आहे, अशी टीका डॉ. अशोककुमार पांडे यांनी केली आहे.

या मुलाखतीत लेखक डॉ. अशोककुमार पांडे यांना राज्यघटनेतील कायद्यांमध्ये करण्यात येणाऱ्या बदलांबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना डॉ. अशोककुमार पांडे म्हणाले की, “राज्यघटना बदलण्याचा प्रयोग सध्या सुरु आहे. याविरोधात एकजूट होण्याची गरज आहे. याविरोधात बोलले पाहिजे, बंड केला पाहिजे”, असे डॉ. अशोककुमार पांडे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या :-
‘त्या’ आदेशामुळे शिवसेनेत नाराजीचा सुर; पदाधिकाऱ्यांनी दिले सामूहिक राजीनामे
..त्यावेळी मी स्टुडिओमध्ये उलटी साफ करायचे, रवीना टंडनचा वैयक्तिक आयु्ष्याबद्दल मोठा खुलासा
‘या’ अभिनेत्रीला स्वत:पेक्षा हुशार आणि सुंदर समजते रेखा, म्हणाली, ‘तिने सगळ्यांना वेड लावले होते’

 

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now