Share

देशाला चारच लोक चालवतात, त्यातही ‘दोघे विकतात अन् दोघे खरेदी करतात’

प्रसिद्ध लेखिका अरुंधती राय(Arundhati Roy) यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली आहे. केंद्र सरकारवर टीका करत असताना लेखिका अरुंधती राय यांनी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर हल्लाबोल केला आहे. पंजाब विद्यापीठात एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात लेखिका अरुंधती राय यांनी पंतप्रधान मोदींसह देशातील प्रसिद्ध उद्योगपतींवर निशाणा साधला आहे.(writer arundhati roy statement on pm modi)

“या देशाला सध्या ४ लोक चालवत आहेत. त्यापैकी दोन जण खरेदी करतात, तर दोघे जण विकत आहेत”, अशी टीका प्रसिद्ध लेखिका अरुंधती राय यांनी केली आहे. देशातील प्रमुख समाज माध्यमांसह काही संस्थांचा दुरुपयोग केला जातोय, असे देखील अरुंधती राय म्हणाल्या आहेत. यावेळी लेखिका अरुंधती राय यांनी केंद्र सरकारच्या नवीन धोरणांवर टीका केली.

प्रसिद्ध लेखिका अरुंधती राय कार्यक्रमात म्हणाल्या की, “सध्या देशात जातीय तेढ निर्माण करण्यात येत आहे. जात, धर्म, पंथ, भाषा आणि प्रदेश यांपासून पुढे विचार करत आपण एकता जपली पाहिजे”, असे अरुंधती राय म्हंटले आहे. यावेळी लेखिका अरुंधती राय यांनी संस्था आणि संघटनांच्या कार्यपद्धतीवर हल्ला चढवला.

या कार्यक्रमात लेखिका अरुंधती राय यांनी शेतकरी आंदोलनाचे कौतुक केले. शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे कौतुक करताना लेखिका अरुंधती राय म्हणाल्या की, “या आंदोलनाने जगाला दाखवून दिलं की आपल्या न्याय हक्कासाठी आपण कशारितीने सरकारच्या डोळ्यात डोळे घालून संवाद करू शकतो.”

सध्या देश चार लोक चालवत आहेत, असा टोला अरुंधती राय यांनी पंतप्रधान मोदींना, अमित शहांना आणि दोन बड्या उद्योगपतींना नाव न घेता लगावला आहे. यावेळी प्रसिद्ध लेखिका अरुंधती राय यांच्या बोलण्याचा रोख उद्योगपती गौतम अदानी आणि मुकेश अंबानी यांच्याकडे होता. यावेळी मोदी सरकार देशात जातीय जातीय तेढ निर्माण करत आहे, असे लेखिका अरुंधती राय यांनी सांगितले.

पंजाब विद्यापीठातील या कार्यक्रमाचा काही विद्यार्थिनींनी निषेध केला होता. लेखिका अरुंधती राय या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्यामुळे काही विद्यार्थिनींच्या गटाने या कार्यक्रमाचा विरोध केला होता. यावेळी विद्यार्थिनींनी घोषणाबाजी देखील केली होती. लेखिका अरुंधती राय यांनी अनेक प्रसिद्ध पुस्तकांचे लेखन केले आहे.

महत्वाच्या बातम्या :-
लव्हबर्डस विकी-कतरिनाने साजरी केली लग्नानंतरची पहिली रंगपंचमी; पहा सुंदर फोटो
द्वेष आणि हिंसाचार पसरवण्यासाठी कश्मीर फाइल्ससारखे चित्रपट बनवले जातात, ममता बॅनर्जीच वादग्रस्त वक्तव्य
‘काश्मीर फाइल्स चित्रपटावर टीका करणाऱ्या व्यक्तीला जन्मठेप द्या’, यशवंत सिन्हा यांचे वादग्रस्त वक्तव्य

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now