काळजी वाढली! महाराष्ट्र या ठिकाणी 7 दिवसांचा कडक लॉकडाऊन, जाणून घ्या सविस्तर

बारामती। राज्यात गेले वर्ष दीड वर्षभर कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. अशातच कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारकडून कडक लाॅकडाऊनची घोषणा करण्यात आली होती.

मात्र मागील काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण कमी होत असल्याची चिन्हे असल्याने अनेक ठिकाणी कोरोनाचे नियम शिथील करण्यात आले होते. त्यामुळे थोडा का होईना नागरिकांना दिलासा मिळाला होता. मात्र आता पुन्हा भीती वाढवणारी बातमी समोर आली आहे. ज्यात गेल्या दोन दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे.

त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, आता बारामतीमधील काटेवाडी गावात सात दिवसांसाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आलाय. गावामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यानं गावकऱ्यांनी एकत्र येत सात दिवस गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे पुढील 7 दिवस गाव शंभर टक्के बंद राहणार आहे. दोन दिवसापूर्वी गावांमध्ये अँटीजेन कॅम्प घेतला होता त्यावेळी 27 रुग्ण आढळल्याने निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. त्यामुळे आता गावकऱ्याच्या चिंतेत वाढ झाली आहे.

मागील गेल्या महिनाभर कोरोना रुग्णसंख्या कमी झाली होती. मात्र जरी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका कमी झाला असला तरी आता राज्यावर डेल्टा प्लसचं संकट घोंगावू लागलंय. त्यामुळे राज्यात पुन्हा कडक निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीनं सरकारी स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत.

अनलॉकमुळे गर्दी वाढू लागल्यानं संसर्गाचा धोकाही वाढला आहे. पुन्हा रुग्ण संख्या दहा हजारांच्या घरात गेली आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेच्या धर्तीवर निर्बंधांबाबत लागू असलेले निकष अधिक कठोर करण्यात येतील. गर्दी टाळण्यासाठी कडक नियमावली करण्यात येईल.

अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकानांच्या वेळाही कमी करण्यात येण्याची शक्यता आहे. व या संदर्भातील निर्णय लवकरच राज्य सरकारकडून घेण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

महत्वाच्या बातम्या
स्मिता पाटीलच्या मृत्यूनंतर तुटलेले राज बब्बर रेखाच्या प्रेमात झाले होते पागल
लग्न झाल्या झाल्या नवरीने नवऱ्यासाठी केला भन्नाट डान्स, पाहून तुम्हालाही कौतुक वाटेल
मुलाने नोकरी सोडून आईला दोन वर्षे १८ राज्यात ५६००० किलोमीटर फिरवले; तेही स्कूटरवर
आपल्या घरातील लाईटबील जास्त का येते जाणून घ्या अन्यथा असेच लुटले जाल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.