भारतातच आहे जगातील सर्वात मोठे कुटुंब; या माणसाला आहेत ३९ बायका अन् ९४ मुलं, तरीही…

काळाच्या गरजेनुसार अनेक लोक विभक्त कुटुंब पद्धतीने राहत आहे. पण आज आपण अशा कुटुंबाबद्दल जाणून घेणार आहोत, जे जगातील सगळ्यात मोठे कुटुंब आहे. हे कुटुंब मिझोरममध्ये राहते.

या कुटुंबात १८१ सदस्य आहे. हे कुटुंब १०० खोल्यांच्या घरात राहते. या कुटुंबाचे नाव जिओना चाना असे असून असे या कुटुंबाचे नाव गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवलेले आहे.

मिझोरमच्या बक्तवांग गावात हे कुटुंब राहते. हे सर्व जण चार मजली घरामध्ये १०० खोल्यांच्या घरात राहतात. चाना यांनी पहिले लग्न वयाच्या १७ व्या वर्षी केले होते. तसेच त्यांनी एका वर्षात १० लग्न केले होते. तर चाना यांना ३९ बायका आहे.

जिओना चाना यांना ३९ बायका, ९४ मुले, १४ सुना आणि ३३ नातवंडे आणि पंतू आहेत. आता असे असले तरी त्यांच्या कुटुंबातले सदस्य एकमेकांसोबत प्रेमाने आणि आदराने जगताना दिसून येतात.

चाना हे सध्या ७२ वर्षांचे आहे. या कुटुंबाचे आपले काही नियम असून कुटुंब प्रमुख या चाना यांच्या पहिल्या पत्नी जाथिआंगी या आहे. जाथिआंगी या सर्वांची दैनिक कामे, म्हणजेच कपडे धुणे, जेवण बनवणे, भांडणे घसणे इत्यादी कामे वाटून देतात. चाना स्वत:ला भाग्यशाली समजतात की त्यांचे कुटुंब जगातील सर्वात मोठे कुटुंब आहे.

आता जगातले सर्वात मोठे कुटुंब म्हटले तर त्यांना दिवसाला अन्नही तेवढेच लागत असेल. या कुटुंबाला एका दिवसात ३० चिकन, २०० पेक्षा जास्त अंडी, ६० किलो बटाटे, १०० किलो तांदूळ लागतात. तर दिवसाला हे कुटुंब २० किलोची फळे खातात.

कुटुंबात इतके सदस्य असल्याने त्यांची नावे आणि त्यांचे वाढदिवस लक्षात ठेवणे कठीण आहे. पण जिओना यांचा मोठा मुलगा नुनपार्लियाना म्हणतो, कुटुंबातील सर्व सदस्यांची नावे लक्षात ठेवणे कठीण नाही, कारण ते सर्व कुटुंबाचेच सदस्य आहे. तसेच त्यांचे आम्हाला वाढदिवसही आठवतात. कारण कुटुंब मोठे असल्याने एकाला तरी दुसऱ्याच्या वाढदिवसाची आठवण राहते.

जिओना चाना यांच्या कुटुंबाला त्यांच्या परिसरात खुप महत्व आहे. एकाच कुटुंबातून बरीच मते मिळत असल्याने परिसरातील राजकीय नेते आणि राजकीय पक्ष जिओना चाना यांच्यासोबत चांगले संबंध ठेऊन असतात.

महत्वाच्या बातम्या-

क्रिकेटपटू ऋतूराज गायकवाडवर ‘या’ प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा लव्ह
लष्करातील मेजर ते प्रसिद्ध अभिनेते असा झंझावाती प्रवास करणारे विक्रमजीत कंवरपालांचे कोरोनाने निधन
कपडे काढ मला तुझे पुर्ण शरीर बघायचे आहे; कास्टिंग काऊचबद्दल अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.