जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन उद्या लाँच होणार, पाहा काय असेल किंमत आणि फीचर्स

मुंबई । सर्वांचे लक्ष लागलेला जिओचा सर्वात स्वस्त असलेला स्मार्ट फोन आता उद्या लॉंच होणार आहे. JioPhone Next या वर्षाच्या सुरुवातीला Reliance च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत लाँच करण्यात आला होता. आता JioPhone Next लाँचसह कंपनी आपला पहिला स्मार्टफोन बाजारात आणत आहे.

हा फोन गणेश चतुर्थीच्या दिवशी अर्थात १० सप्टेंबर रोजी बाजारात लाँच होणार आहे. यामुळे याची मोठी विक्री होण्याची शक्यता आहे. हा स्मार्टफोन दोन रॅम आणि स्टोरेज वेरिएंटमध्ये लाँच केला जाऊ शकतो.

यामध्ये 2GB RAM + 16GB स्टोरेज आणि 3GB RAM + 32GB स्टोरेज आहे. 2GB RAM ची किंमत जवळपास 3499 असू शकते. तर टॉप एंड मॉडेलची किंमत जवळपास 5,000 रुपयांपर्यंत असू शकते, यामुळे हा सर्वात स्वस्त स्मार्ट फोन असणार आहे.

यामध्ये 13 मेगापिक्सल कॅमेरा सेंसर आहे, तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी फोनला फ्रंटमध्ये 8 मेगापिक्सल सेंसर आहे. यामुळे याच्या किमतीच्या मानाने फोन चांगलाच परवडणारा आहे. अजून JioPhone Next च्या किमतीचा तसेच फीचर्सचा अधिकृतरित्या खुलासा करण्यात आलेला नाही.

अनेक दिवसांपासून या मोबाईलची चर्चा सुरू आहे. अखेर उद्या हा स्मार्ट फोन लॉंच होणार आहे. 4G असलेला हा स्मार्ट फोन खरेदीसाठी अनेकजण इच्छुक आहेत. यामुळे आता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.