‘जेवण नंतर करू, आधी देशासाठी ऑक्सिजन करायचाय’; खानेपिणे सोडून काम करताहेत कामगार

नवी दिल्ली | देशात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. रुग्णांना बेड,लस, ऑक्सिजन यांचा मोठा तुवडा जाणवू लागला आहे. ऑक्सिजन अभावी रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडत आहेत.

देशात सर्व राज्यात कोरोनाची भयानक परिस्थीती आहे. केंद्र सरकारने ऑक्सिज पुरवठ्यासाठी ऑक्सिजन एक्स्प्रेसची सुरूवात केली आहे. जेणेकरून रुग्णांना लवकरात लवकर ऑक्सिजनचा पुरवठा होईल.

देशात झारखंड राज्यात बोकारो येथे मोठ्या स्टील कंपन्या आहेत आणि इथूनचं देशातल्या शहरांमध्ये ऑक्सिजन एक्सप्रेस मार्फत पुरवठा केला जातो. बोकारो ऑक्सिजन प्लांटमध्ये दिवसाला १५० टन ऑक्सिजन तयार केला जातो.

स्टील प्लांटमध्ये ऑक्सिजन बनवणारे अधिकारी आणि कामगार जीवाची बाजी लावून काम करत आहे. दिवस रात्र मेहनत करून देशासाठी ऑक्सिजनचं उत्पादन करत आहेत. प्लांटमध्ये २५ अधिकारी आणि १५० पेक्षा जास्त कामगार काम करत आहे.

प्लांटमधील एक कामगार वृतवाहिनीशी बोलताना म्हणाला की, आम्हाला देशासाठी काम करण्याची संधी मिळाली आहे. आम्हाला कुणी जेवणाची आठवण करून दिली तर आम्ही म्हणतो जेवणाचा डब्बा तर नंतरही खाऊ शकतो. पहिल्यांदा देशासाठी ऑक्सिजन बनवला पाहिजे.

बोकारोमध्ये दोन ऑक्सिजन बनवणारे प्लांट आहेत. यामध्ये तीन शिफ्टमध्ये कामगार काम करतात. आठ तासांची एक शिफ्ट आहे. यामध्ये न थकता न थांबता कर्मचारी काम करत आहेत.

बोकारोमधून आतापर्यंत झारखंड राज्याला ३०६ मेट्रिक टन, उत्तर प्रदेशला ४५६ मेट्रीक टन, मध्य प्रदेशला १६ मेट्रिक टन, पंजाबला ४४ मेट्रिक टन, पश्चिम बंगालला १९ मेट्रिक टन, बिहारला ३७४ मेट्रिक टन ऑक्सिनचा पुरवठा करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या-
सुजय विखेंनी दिल्लीवरून आणलेल्या इंजेक्शनप्रकरणी हायकोर्ट आक्रमक, कारवाईचे दिले आदेश  
वर्दीला सलाम! धावत्या ट्रेनमध्ये जीव धोक्यात घालत पोलिसाने वाचवला लटकलेल्या प्रवाशाचा जीव; पहा थरारक व्हिडीओ
…म्हणून अभिनेत्री आयशा झुल्काने कधीच आई न होण्याचा निर्णय घेतला; कारण वाचून धक्का बसेल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.