…तर सोनिया गांधी आणि शरद पवारांनी उध्दव ठाकरेंच्या हाताखाली काम करावे- भाजप

बुलढाणा | शिवसेनेचे जनसंपर्क प्रमुख व माध्यम सल्लागार हर्षल प्रधान यांनी काल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबद्दल एक लेख लिहला आहे. यामध्ये हर्षल प्रधान यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे कौतूक करत ते  देशाचे पंतप्रधान व्हावे. अशी सर्वसामान्यांची इच्छा असल्याचं म्हटलं होतंं.

यावरून आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी टोला लगावला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील भाजप आमदार श्वेता महाले यांनी धाड येथे कोविड सेंटर उभारलं आहे. यावेळी उध्दघाटनास प्रवीण दरेकर उपस्थित होते.

यावेळी प्रवीण दरेकर म्हणाले, उध्दव ठाकरेंच्या रुपाने मराठी माणूस पंतप्रधान झाला तर अभिमानच वाटेल. मात्र त्यासाठी संख्याबळ असावं लागतं.  तसेच उध्दव ठाकरे पंतप्रधान झाले तर सोनिया गांधी आणि शरद पवारांनी उपपंतप्रधान म्हणून त्यांच्या हाताखाली काम करावं. असं वक्तव्य भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केलं आहे.

यावेळी  दरेकर यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.  मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकार पुर्णत: अपयशी ठरले आहे. मराठा आरक्षण कसं जाईल याची काळजी राज्य सरकारकडून घेण्यात आली आहे. लोकांना भरकटवण्यासाठी राज्य सरकारकडून वेगवेगळे फंडे उपयोगात आणले जात आहेत. असंही प्रवीण दरेकर म्हणाले आहेत.

काय म्हणाले होते हर्षल प्रधान

शिवसेना नेते हर्षल प्रधान म्हणाले होते की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे देशातील संवेदनशील आणि विनम्र नेत्यांपैकी एक आहेत. उध्दव ठाकरे कोरोनामध्ये सातत्याने जनतेशी संवाद साधत आहेत. सोशल मिडियाच्या माध्यमातून संवाद साधताना त्यांचा प्रामाणिकपणा आणि नम्रता महाराष्ट्राच्या जनतेला आश्चर्यचकित करतो.

कोरोनाच्या काळात त्यांनी कामामधून आपली असामान्य प्रतिमा केवळ राज्यातील जनतेच्या मनातच नाही तर सर्वत्र निर्माण केली आहे. लोकांना आता उध्दव ठाकरे यांना देशाचे पुढील पंतप्रधान म्हणून पाहायचं आहे.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे कधीच जाहीरपणे रडत नाहीत. ते खोटंही बोलत नाहीत. मतदारांना आकर्षित करण्यासाठी ते खोटी आश्वासने देत नाहीत. कधीही केव्हाही ते बोलतात ते शब्द पाळतात. यासाठी लोक त्यांच्यावर प्रेम करतात असं शिवसेना नेते हर्षल प्रधान यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-
आजोबांचा नादच नाय! सॅनिटायझर हाताला दिले लावायला, आजोबांनी हातापायांची केली मालिश; पहा व्हिडिओ
नव्या नवरीने अर्ध्या रात्री बॉयफ्रेंडला बोलावले घरी अन् पुढे जे घडलं ते धक्कादायकच होतं…
जुन्या आठवणींना उजाळा देत सचिन पिळगावकर यांनी शेअर केला लक्ष्यासोबतचा ‘तो’ फोटो
प्रेरणादायी! अवघ्या ४ वर्षांची चिमुकली एक पाय नसताना चढली उंच ढीगारा, पहा व्हिडीओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.