एकेकाळी स्वतः रोलर फिरवून खेळपट्टी तयार करण्याचे काम करायचा, आज गाजवतोय IPL

आयपीएलमध्ये खेळण्याचे अनेकांचे स्वप्न असते. यासाठी अनेक खेळाडू जीवाचे रान करत असतात. तसेच अनेक खेळाडू हे संधी मिळाली की त्याचे सोने करतात. मोठे कष्ट करून हे खेळाडू याठिकाणी येत असतात.

सध्या आयपीएल सुरू असून अनेक खेळाडू जोरदार कामगिरी करत आहेत. यामध्ये भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील युवा खेळाडू रवि बिश्नोईही चमकदार कामगिरी करत आहे. केवळ २० वर्षीय बिश्नोईला त्याच्या कारकिर्दीत अनेकदा चढ-उतारांचा सामना करावा लागला आहे.

आयपीएलच्या लिलावात किंग्स इलेव्हन पंजाबने त्याला २ कोटी रुपयांना विकत घेतले. आणि त्याचे आयुष्यच बदलले. त्याच्या नावावर अनेक विक्रम आहेत. १९ वर्षांखालील विश्वचषक २०२०मध्ये सर्वाधिक विकेट्स त्याच्या नावावर आहेत. आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात त्याने ४ षटके गोलंदाजी करताना केवळ २२ धावा दिल्या.

त्याने अत्यंत गरिबीतून स्वत: खेळपट्टी तयार केली होती. सुरुवातीला स्वत:ची क्रिकेट अकादमी बनवण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्याकडे जास्त पैसे नव्हते, त्यामुळे बिश्नोईने स्वत: खेळपट्टी तयार करण्यासाठी रोलर चालवत होता.

परिस्थिती नसल्याने त्याच्या वडिलांनी त्याला क्रिकेट सोडण्याचा देखील सल्ला दिला होता. मात्र बिश्नोईला लहान असतानापासूनच क्रिकेटची खूप आवड होती. तो सुरुवातीला वेगवान गोलंदाजी करत असायचा. पण पुढे त्याच्या प्रशिक्षकाच्या सल्ल्यावरुन त्याने फिरकी गोलंदाजी करायला सुरुवात केली.

प्रशिक्षकांनी त्याच्या वडिलांची समजून काढल्याने त्याचे क्रिकेट पुढे सुरू राहिले. १९ वर्षांखालील क्रिकेट संघात स्थान मिळवण्यासाठी तो जीवाचे रान करुन मेहनत करत असायचा. परंतु त्याला पावला-पावलावर अपयश येत होते. मात्र त्याने खचून न जाता मेहनत घेतली आहे. आज आयपीएलमध्ये तो स्टार खेळाडू आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.