कोरोना लसीच्या एका डोसने या महिलेला एका रात्रीत बनवले करोडपती, वाचा नेमके काय घडले

अमेरिकेतील ओहियो येथे कोरोना लसीमुळे एक २२ वर्षीय महिला करोडपती बनली आहे. सरकारने अमेरिकेत लसीकरणाला प्रोमोट करण्यासाठी एका लॉटरीचे आयोजन केले होते. या योजनेअंतर्गत त्या महिलेला पहिले बक्षिस मिळाले आहे आणि ती महिला करोडपती झाली आहे.

एवढंच नाही तर एका १४ वर्षीय मुलाला फुल स्कॉलरशिप देण्यात आली आहे. म्हणजे त्याच्या पुर्ण शिक्षणाचा खर्च आता सरकार उचलणार आहे. लसीकरणादरम्यान लोकांमध्ये जागरूकता आणण्यासाठी सरकारने नुकतीच एक योजना सुरू केली होती.

त्यामधील पहिले बक्षिस मिळालेल्या विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली होती. ओहियोचे गर्वनर माइक डिवाइन यांनी सांगितले की, पहिले बक्षिस मिळालेल्या २२ वर्षीय महिलेला एक मिलीयन डॉलर म्हणजे जवळपास ७ कोटी रूपये देण्यात आले आहेत.

तिने काही दिवसांपुर्वी लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्या महिलेला विश्वासच बसत नाहीये की ती एका रात्रीत करोडपती झाली आहे. कोरोना लसीचा एक डोस तिला खुप काही देऊन गेला. जेव्हा तिला ही बातमी कळाली तेव्हा ती तिची जुनी गाडी खरेदी करण्यासाठी चालली होती.

पण आता मिळालेल्या पैशातून ती नवीन गाडी घेणार आहे. ज्या मुलाला स्कॉलरशिप मिळालेली आहे त्याचे पालक खुप आनंदी आहेत. ही योजना सुरू करताना माईक म्हणाले होते की, त्यांचा उद्देश लोकांमध्ये लसीकरणाबाबत जागरूकता पसरवणे आहे.

कारण बरेच लोक लसीकरणाकडे लक्ष देत नव्हते. त्यांनी सांगितले होते की अशा पाच लोकांना निवडले जाईल ज्यांनी कमीत कमी लसीचा एक डोस घेतलेला असेल. ते असेही म्हणाले होते की, काहींना असे वाटेल की मी वेडा झालो आहे.

सरकारी तिजोरीतला पैसा उधळत आहे पण लोकांना कळाले पाहिजे की जेव्हा जीव वाचवण्यासाठी लस उपलब्ध आहे आणि तरीही लस घेतली नाही तर काय होईल? त्यामुळे त्यांनी १ मिलीयन डॉलरचे बक्षिस ठेवले होते, ज्याच्यामुळे लोक लसीकरणाकडे आकर्षित झाले.

महत्वाच्या बातम्या
राज्यात आणखी १५ दिवसांचे लॉकडाऊन होणार; राजेश टोपे यांचे सुचक वक्तव्य
मोठी बातमी! मराठा आरक्षणप्रकरणी संभाजीराजे राजीनामा देण्याची शक्यता
..त्यामुळे करण जोहरने मला तीन वेळा लग्नासाठी नकार दिला होता, नेहा धुपियाचा खुलासा
..त्यामुळे करण जोहरने मला तीन वेळा लग्नासाठी नकार दिला होता, नेहा धुपियाचा खुलासा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.