या सासूने समाजासमोर नवा आदर्श केला उभा, आपल्या सूनांना गौराई बनवून केली तीन दिवस पूजा

राज्यभरात सध्या गणेशोत्सव साजरा केल जात आहे. अशातच गौराईचा सणही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. गौराईच्या सणात पारंपारिक पद्धतीने गौराईंच्या मुर्त्यांची पूजा केली जाते. पण या गौराईच्या सणामध्ये वाशिमच्या सिंधूबाई सोनू चांगल्याच चर्चेत आल्या आहे.

सिंधूबाईंनी आपल्या दोन सुनांचीच गौराई म्हणून तीन दिवस त्यांची पूजा केली आहे. त्यामुळे सुनांमध्ये गौराई पाहणाऱ्या सिंधूबाई यांच्या या वेगळ्या उपक्रमामूळे पुर्ण जिल्ह्याभरात त्यांचे कौतूक केले जात आहे.

राज्यभराप्रमाणेच वाशिम शहरातील ड्रीम लँड सिटीमध्ये राहणाऱ्या सिंधूबाई सोनू यांनीही गौराई सण साजरा केला आहे. पण त्यांनी चक्क त्यांच्या सुनांनाच गौराई केले असून तीन दिवस त्यांची पूजा केली आहे. त्यामुळे जीवंत अशा चालत्या बोलत्या गौराईंची पूजा करुन सिंधूबाईंनी सर्वांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.

पुर्ण शहरात सिंधूबाईंच्या गौरी चर्चेचा विषय होत्या. त्यामुळे हा गौरी पूजनाचा सोहळा पाहण्यासाठी नागरीक एकच गर्दी करत होते. सासू आणि सूनेमधला हा जिव्हाळा कायम ठेवण्यासाठी अशाप्रकारचा सोहळा साजरा केल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आपल्याला बऱ्याच ठिकाणी सासू-सूनेचे भांडण पाहायला मिळते. सिंधूबाईंनी आपल्या सूनांनाच गौराई करुन त्यांची पूजा केल्यामुळे त्यांचे पुर्ण शहरातून कौतूक केले जात आहे. त्यांनी आपल्या दोन्ही सुनांना गौराई बनवले होते.

सिंधूबाईंनी सुनांना गौराईप्रमाणे गौराईच्या मंडपात बसून त्यांना गौराईचे रुप दिले होते. तसेच गौराई आगमनापासून ते विसर्जनापर्यंत म्हणजेच तीन दिवस सिंधूबाईंनी त्यांची पूजा केली. सासूबाईंच्या या प्रेमाचा आम्हाला खुप अभिमान आहे, असे सुनांनी म्हटले आहे

महत्वाच्या बातम्या-

‘सोमय्या बिल्डरांसाठी काम करतात, त्यातून त्यांच्या संस्थेला निधी मिळतो, आरोपाने राज्यात खळबळ
मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक! ‘हा’ निर्णय घेत पेट्रोल डिझेलच्या किंमती निम्म्यावर आणणार
अरे वाह! कन्यारत्न झाले म्हणून अनोख्या पद्धतीने केला आनंद साजरा, तब्बल ५० हजार लोकांना मोफत पाणीपुरी वाटल्या

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.