VIDEO: दागिन्यांच्या दुकानामध्ये महिलांचा प्रताप; अशी चोरी केली की सर्वच झाले हैराण

दागिन्यांच्या दुकानात चोरी झाल्याचे अनेक व्हिडिओ तुम्ही बघितले असेल. शहरांमध्ये चोरीच्या घटना या दिसून येतच असतात, पण चोर ज्या पद्धतीने शक्कल लढवून चोरी करतात, त्यामुळे अनेकदा काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात.

चोरी करण्यात फक्त पुरुषच नाही, महिलाही माहिर असल्याचे कधी कधी आपल्याला दिसून येते. आता अशीच एक घटना मुंबईमध्ये घडली आहे. दागिने खरेदी करण्यासाठी आलेल्या महिलांनी दागिनेच चोरी केले आहे.

महिलांनी दागिने चोरी केल्यामुळे परीसरात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास केला असता यामध्ये पुर्ण टोळीचा हात असल्याचे समजले. पोलिसांनी पुर्ण टोळीला अटक केली आहे. तसेच संबंधित घटनेचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

महिला चोरांची ही मुंबई आणि आजूबाजूच्या भागात सक्रिय होती. त्या दागिने खरेदी करण्याचे सांगत दागिन्यांच्या दुकानात दागिने बघायच्या. त्यानंतर गुपचुत ते दागिने चोरायच्या आणि काहीही खरेदी न करात तिथून निघून जायच्या.

सोमवारी सकाळी कांदिवली इथल्या एका ज्वेलरी दुकानात तीन महिला दागिने बघण्यासाठी आल्या होत्या. त्यामध्ये एका महिलेने दागिने दाखवण्याची विनंती केली. त्यानंतर त्या महिलेच्या दोन साथीदार महिला आल्या आणि त्यांनीही दागिने दाखवण्यासाठी सांगितले.

जेव्हा दुकानदार दागिने दाखवत होता, तेव्हा दुकानदाराचे लक्ष नसताना एका महिलेने आपल्या साडीत एक पाकीट लपवले. त्यानंतर दुकानदाराच्या लक्षात आले, त्याने त्यांची विचारपुस केली पण आम्ही दागिने चोरले नसल्याचे सांगुन त्या दागिने खरेदी न करताच तिथून निघून गेल्या.

पैंजनाचे पाकीट नसल्यामुळे दुकानदाराने सीसीटीव्ही फुटेज चेक केले. त्यावेळी हा सर्व प्रकार समोर आला आहे. दुकानदाराने लगेच पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी लगेच त्यांचा शोध सुरु केला. पोलिसांनी त्या महिलांना अटक केली आहे. दोन महिलांना अटक करण्यात आली असून एक महिला अजूनही फरार आहे.

महत्वाच्या बातम्या-

माणूसकीला काळिमा! नवजात मुलीचे पाय उलटे असल्यामुळे आईवडिलांनी काढला रुग्णालयातून पळ
कुत्र्यावर इतका भयानक अत्याचार; व्हिडिओ पाहून जॉन अब्राहमची पण उडाली झोप
थरारक! रस्त्यावर सायकलवरुन पडला तरूण, उठण्याचा प्रयत्न करताच मागून कार आली अन्… पहा व्हिडिओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.