Homeताज्या बातम्यामाझ्याशी संबंध ठेव म्हणत बळजबरी करत होता ठेकेदार, संतापलेल्या महिलेने उचलले ‘हे’...

माझ्याशी संबंध ठेव म्हणत बळजबरी करत होता ठेकेदार, संतापलेल्या महिलेने उचलले ‘हे’ धक्कादायक पाऊल

गेल्या काही महिन्यांपासून राज्यभरात महिला अत्याचाराचे अनेक घटना घडत आहे. तसेच त्यामुळे अनेक धक्कादायक प्रकारही घडत आहे. असाच एक प्रकार औरंगाबाद जिल्ह्यातील वाळूज भागातून समोर आला आहे. ज्यामुळे संपुर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

या भागात राहणाऱ्या एका महिलेसोबत प्रेम संबंध ठेवण्यासाठी ठेकेदार तिला जबरदस्ती करत होता. त्याच्या जाचाला कंटाळून त्या महिलेने विष पिऊन आत्महत्या केली आहे. या प्रकरणी वाळूज एमआयडीसा ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित घटना ही कमलापूरची आहे. इथे एक व्यक्ती आपल्या पत्नीसोबत राहत होता. त्याची पत्नी खाजगी कंपनीत काम करत होती. तर त्यांच्या शेजारी राहणारे ठेकेदार रामदास गायकवाड यांच्यासोबत महिलेची ओळख झालेली होती. पण या ओळखीचा रामदास गैरफायदा घेत होता.

रामदास हा महिलेला तु माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेव असा दवाब टाकत होता. रामदास सतत त्रास देत असल्यामुळे महिलेने याबाबत मावस भाऊ आणि पती या दोघांनाही माहिती दिली. त्यामुळे नंतर आपल्या पत्नीला त्रास देऊ नकोस असा समज ठेकेदाराला पतीने दिला होता.

पण अशात महिलेला तिच्या कुटुंबाकडून पाठिंबा मिळाला नाही. तुझे रामदासशी प्रेमसंबंध आहे, असे सांगत तिच्यावरच आरोप करण्यात आले. तसेच तिला सासरच्या कुटुंबाकडून शिवीगाळही करण्यात आली होती. या गोष्टींमुळे महिलेला खुप मानसिक त्रास होत होता.

सततच्या त्रासाला कंटाळून महिलेने वाळूजच्या एका खाजगी कंपनीत काम सुरु केले. पण रामदासची पत्नी सविता गायकवाडला महिलेवर संशय होता. तु कंपनीत जायचे सांगून माझ्या पतीसोबत फिरते असा आरोप रामदासची पत्नी त्या महिलेवर करत होती. त्यामुळे सततच्या त्रासाला कंटाळून ३० डिसेंबरला विष प्राषाण केले होते. त्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान तिचा मृत्यु झाला आहे.

या प्रकरणी चार लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामदास गायकवाड, सविता रामदास गायकवाड, स्वप्निल रामदास गायकवाड, राधे रामदास गायकवाड, अशा चौघांविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

महत्वाच्या बातम्या-
व्हायरल फोटो: उद्योगपती आनंद महिंद्रांनी या फोटोचे वर्षातील सर्वोत्कृष्ट फोटो म्हणून केले वर्णन
त्याला पण माहिती आहे महिंद्राची कार आहे; आनंद महिंद्रांनी शेअर केला कार ओढणाऱ्या वाघाचा व्हिडिओ
बॅट घेऊन ‘या’ खेळाडूचे डोकं फोडायला निघाला होता शोएब अख्तर, शाहिद आफ्रिदीनेही दिला होता पाठिंबा

ताज्या बातम्या