महिलांनी पुरुषांसोबत सेक्स करणं बंद करायला हवे, प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मागणीने चर्चांना उधाण

मुंबई । आपण बघत असतो की सेक्सबद्दल कोणीही जास्त करून पुढे येऊन बोलत नाही. जर कोण बोलले तर त्याच्याकडे वेगळ्या प्रकारे बघितले जाते. असे असताना आता अमेरिकेची प्रसिद्ध अभिनेत्री बेट्टे मिडलरने ‘सेक्स स्ट्राइक’ची हाक दिली आहे. तिने याबाबत अनेक गोष्टींवर हात घालून यावर उघड भाष्य केले आहे.

गायक आणि अभिनेत्री मिडलर म्हणाली, सगळ्या महिलांनी पुरुषांसोबत सेक्स करण्यास नकार दिला पाहिजे. मिडलरने नवीन टेक्सास गर्भपात कायद्याच्या निषेधार्थ या गोष्टी सांगितल्या आहेत. यामुळे आता चर्चा सुरू झाली आहे.

अभिनेत्री बेट्टे मिडलरने नवीन टेक्सास गर्भपात कायद्याच्या निषेधार्थ सोशल मीडियावर एक मोहीम सुरू केली आहे. ती ट्विट करून नेत्यांवर निशाणा साधत आहे. गोल्डन ग्लोब विजेता बेट्टे मिडलरने सिनेट विधेयक 8च्या तरतुदीला महिलांच्या हक्कांविरोधात म्हटले आहे.

यामध्ये अंतर्गत गर्भपातावर बंदी घालण्याचा नियम आहे. यामध्ये तिने गर्भधारणेच्या सहा आठवड्यांनंतर गर्भपात करण्यावर बंदी घालणाऱ्या कायद्याला विरोध केला आहे. बहुतेक लोकांचा असा विश्वास आहे की, या कायद्यामुळे नको असलेली गर्भधारणा असलेल्या महिलांना समस्या निर्माण होतील. या काळात महिलांसाठी असा कायदा का आणला गेला?

यामुळे सध्या याची चर्चा सुरू झाली आहे. तिच्या या सोशल मीडियावरील मोहिमेत अनेकांनी आपले मत व्यक्त केले आहे. यामुळे या मोहिमेला अनेकजण पाठिंबा देखील देत आहेत, तसेच काहींनी विरोध देखील केला आहे.

ताज्या बातम्या

तुरुंगात असणाऱ्या नेत्यासह त्याच्या पत्नीला ओवैसींनी एमआयएममध्ये घेतलं; विरोधकांनी टीका करताच दिलं ‘हे’ उत्तर

अभिनेता शाहरुख खान मुलगा व मुलगीमध्ये करतो भेदभाव; एका प्रश्नामुळे सत्य आलं समोर

मोठी बातमी! रिलायन्सच्या शेअर्समध्ये मोठी वाढ, मुकेश अंबानी १०० अब्ज डॉलर्स क्लबच्या शर्यतीत

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.