सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होतं असतात. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ असतात. या व्हिडिओमुळे आपलं मनोरंजन होतं असतं. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतं आहे. हा व्हिडिओ(Video) पाहून युजर्सना मोठा धक्का बसला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ एका चोरीचा आहे.(women mobile stoloen video viral on social media )
या व्हिडिओमध्ये एक महिला हात सफाई करत दुकानामधून मोबाईल लंपास करते. हा व्हिडिओ दुकानातील सीसीटीव्ही फुटेजचा आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहे. या व्हिडिओमध्ये एक काकू दुकानात आपल्या शेजारी उभ्या असलेल्या महिलेच्या पर्समधून मोबाईल चोरत असल्याचे दिसून येते.
या व्हिडिओमध्ये आपल्याला एका दुकानात खूप गर्दी असल्याचे दिसून येते. ग्राहक सामान घेण्यासाठी खूप घाई करत आहेत, असे आपल्याला व्हिडिओमध्ये दिसते. त्यावेळी एक काकू त्या दुकानात येते आणि त्या ग्राहकांच्या गर्दीत जाऊन उभी राहते. त्यानंतर काकू दुकानदाराकडे काही वस्तूंची मागणी करते आणि गर्दीत तशीच उभी राहते.
यानंतर काकू गर्दीत शेजारी उभ्या असलेल्या महिलेच्या पर्समध्ये हळूच हात टाकते आणि पर्समधील मोबाईल चोरते. काकू तो मोबाईल आपल्या पर्समध्ये ठेवते. त्यानंतर काकू त्या दुकानातून निघून जाते. यावेळी ज्या महिलेचा मोबाईल चोरण्यात आलेला आहे, तिला या गोष्टीचा काहीच थांगपत्ता लागत नाही. ती महिला त्या दुकानात सामना घेण्यासाठी गर्दीत तशीच उभी राहते.
दुकानाच्या सीसीटीव्हीमध्ये ही संपूर्ण घटना रिकॉर्ड झाली आहे. या घटनेचा सीसीटीव्हीमध्ये रिकॉर्ड झालेला संपूर्ण व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. gided या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एका युजरने कमेंट करत म्हंटले की, “अशा लोकांपासून सावध राहा.”
अनेक युजर्सनी लोकांना हा व्हिडिओ पाहण्याचे आवाहन केले आहे. “फसवणूक टाळायची असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा”, असा सल्ला अनेक युजर्सनी नागरिकांना दिला आहे. या व्हिडिओमुळे ग्राहकांना दुकानात सामान घेताना सतर्क राहण्याच्या सूचना देखील युजर्सनी दिल्या आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतं आहे.
महत्वाच्या बातम्या :-
मोठी बातमी! ‘या’ महीन्यात मुंबई सहावेळा पाण्याखाली जाणार; हवामान विभागाचा अलर्ट
मथुरेतील ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाबाबत मोठी बातमी; ‘विहिरीत सापडले शिवलिंग’
उर्मिलासोबतच्या नात्यावर महेश कोठारेचा मुलगा आदिनाथने केला मोठा खुलासा; म्हणाला, सोशल मीडियावर….