घर विकून सुरू केला ‘हा’ व्यवसाय, आता महिन्याला कमावतात १ कोटी रूपये

आज आम्ही तुम्हाला एका महिलेची यशोगाथा सांगणार आहोत ज्या महिन्याला १ कोटी रूपये कमवत आहेत. त्यांचे नाव आहे शुभ्रा चड्ढा. चुंबक या कंपनीच्या त्या संस्थापक आहेत. सुरूवातीला त्यांनी कधीही विचार केला नव्हता केला की त्यांना व्यवसाय करायचा आहे.

बिझनेस करण्यासाठी त्यांच्याकडे आयडिया तर होती पण त्यांच्याकडे चांगल्या पगाराचा कॉर्पोरेट जॉब होता. हा जॉब सोडून बिझनेस करायचा म्हणजे हे खुप रिस्की काम होतं. पण २००८ मध्ये त्यांना एक मुलगी जन्माला आली आणि त्यांनी आपली नोकरी सोडली.

त्यांच्याकडे हीच वेळ होती बिझनेसबद्दल विचार करण्याची. पण सहा महिन्यातच त्यांना व्यवसायात खुप नुकसान झाले. या कठीण काळात त्यांना त्यांच्या पतीने साथ दिली. आता सध्याला चुंबक ब्रॅन्डचे देशात १७ स्टोअर्स आहेत आणि ई कॉमर्स शॉपिंग प्लॅटफॉर्म आहेत.

तुम्हाला जर माहिती नसेल तर चुंबक ब्रॅन्ड हे कपडे, बॅग्ज, गिफ्ट्स, दागिने, होम डेकोर अशी अनेक उत्पादने विकते. त्यांचे लक्ष्य असे ग्राहक होते जे सतत गिफ्टच्या शोधात असतात. जे लोक सतत काहीतरी नवीन शोधत असतात त्यांच्यासाठी उत्पादने बनवण्याचे काम त्यांनी केले.

त्यांनी जवळपास एक वर्ष डिझाईन, सप्लायर, प्राईसिंग, रिटेल स्ट्रॅटेजी यावर काम केले आणि चुंबकची सुरूवात झाली. शुभ्रा आणि त्यांच्या पतीने ४० लाखाला आपले घर विकले आणि व्यवसायाला सुरूवात केली होती.

हा खुप मोठा निर्णय होता. तसे म्हणायचे झाले तर तो जुगार होता. आता ते तीन रूम्सच्या फ्लॅटमध्ये राहायला गेले होते. सुरूवातीचे सहा महिने त्यांच्यासाठी खुप कठीण होते. कंपनी घाट्यात चालली होती.

शुभ्रा यांनी आपले पहिले स्टोर बंगळुरू येथे उघडले होते. हे स्टोअर त्यांनी आपले पती विवेक प्रभाकर यांच्यासोबत उघडले होते. सुरूवातीला या व्यवसायात मॅग्नेट्स, की चैन आणि उश्यांचे कव्हर्स होते.

आता १०० पेक्षा जास्त उत्पादने त्यांच्या दुकानात आहेत. ते आपल्या वस्तू वेबसाईट आणि ई कॉमर्सच्या माध्यमातून विकतात. त्यांचे देशभरात १७ आउटलेट्स आहेत. वर्षाला त्यांची कमाई १२ कोटी आहे.

शुभ्रा म्हणाल्या की, त्यांच्याकडे दोन पर्याय होते. एक तर दुसऱ्या दुकानात वस्तू विकायला द्यायच्या आणि नफा कमवायचा. तर दुसरा पर्याय म्हणजे ब्रॅन्डमध्ये आपले पैसे गुंतवायचे आणि आपली दुकाने उघडायची. त्यांनी लाँग टर्म फायद्यावर लक्ष केंद्रित केले.

शुभ्रा ब्रँन्डला आपला लाईफस्टाईल ब्रँन्ड तयार करायचा असे त्यांचे लक्ष होते. आज त्या महिन्याला १ कोटी रूपये कमावत आहेत. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कळवा. जर ही माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.

महत्वाच्या बातम्या
सैराटफेम आर्चीला मनापासून आवडतो ‘हा’ अभिनेता, स्वत: तिनेच उघड केलं गुपित, नाव ऐकून थक्क व्हाल!
सलाम! सफाई कर्मचाऱ्यांची वाट न बघता मंत्र्याने स्वत:च्या हाताने पुसली कोरोना वार्डाची फरशी
दररोज रात्री पत्नी दूधातून द्यायची पतीला झोपेच्या गोळ्या; एका रात्री पतीचे डोळे उघडले अन्…
धक्कादायक! UPSC परीक्षा उत्तीर्ण प्रांजलची कोरोनाविरुद्धची झुंज अपयशी, उपचारादरम्यान मृत्यू

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.