मुलीच्या डोक्यातील कोंडा घालवण्यासाठी केला घरगुती उपाय, आता त्याच्यातूनच कमावतेय करोडो

आज आम्ही तुम्हाला केरळच्या तिरूवनंतपुरम येथील रहिवासी असणाऱ्या विद्या. एम. आर. यांची यशोगाथा सांगणार आहोत. विद्या ह्या एक कर्मचारी आहेत आणि त्या कम्प्यूटर असिस्टंट म्हणून काम करतात.

दोन वर्षांपुर्वी त्यांनी घरातून हेअर ऑईल स्टार्टअप सुरू केला होता. आज त्या एक डझनापेक्षा जास्त प्रॉडक्ट्स बनवितात. त्यांचे हे प्रॉडक्ट कॅनडा, अमेरिका सारख्या सात देशांमध्ये निर्यात होते. त्यांना यातून दर महिन्याला १० लाखांची कमाई होते.

४२ वर्षांच्या विद्या म्हणाल्या की त्यांनी कधीच बिझनेस करायचे ठरवले नव्हते. त्यांचे जीवन साधेपणाने चालू होते पण त्यांच्या मुलीला वारंवार केसांमध्ये कोंडा होत होता. शाळेतसुद्धा तिच्या मैत्रिणी तिला कोंड्यावरून बोलत असत.

विद्या यांची मुलगी कोंड्यामुळे खुप त्रस्त होती. तिने अनेक शॅम्पू बदलले, तेल बदलले पण काहीही फायदा झाला नाही. विद्या यांनी आपल्या आईशी याबाबत चर्चा केली. त्यांना वाटले त्यांच्याकडे काहीतरी घरेलु उपाय असेल.

विद्या यांच्या आईने त्यांना एक पारंपारिक उपाय सांगितला. त्यानंतर विद्या यांनी नारळाचे दुध, कोरफड, आवळा आणि जास्वंद यांचे मिश्रण तयार करून एक तेल तयार केले. हे तेल तयार करण्यासाठी त्यांना ३ दिवस लागले होते.

त्या म्हणाल्या की, मला विश्वास नव्हता की माझे तेल काम करेल पण ते तेल लावल्यानंतर माझ्या मुलीचा कोंडा नाहिसा झाला. माझ्यासाठी हा एक चमत्कारच होता. ज्या समस्येपासून माझी मुलगी इतके वर्षे त्रस्त होती ती समस्या दूर झाली.

जेव्हा त्यांची मुलगी गायत्री शाळेत गेली तेव्हा तिचा कोंडा दूर झालेला पाहून तिच्या मैत्रिणी अवाकच झाल्या. सगळेजण कोंडा कसा दूर झाला हे विचारू लागले. मग गायत्री म्हणाली की माझ्या आईने एक तेल तयार केले आहे.

ते तेल लावल्यानंतर माझा कोंडा दूर झाला. त्यानंतर त्यांच्या तेलाची मागणी होऊ लागली. विद्या यांनी अनेक नातेवाईकांना तेल पुरवले. अनेकांनी पुन्हा पुन्हा तेलाची मागणी केली. त्यानंतर त्यांच्या शेजारी राहणाऱ्या महिलेने त्यांना स्टार्टअप सुरू करण्याचा सल्ला दिला.

मग त्यांनी लोकल मार्केटमध्ये तेल पाठवायला सुरूवात केली. हळूहळू त्यांच्या तेलाला खुप मागणी वाढली. मग त्यांनी स्वताचा बिझनेस सुरू करण्याचे ठरवले. मग त्यांनी २०१८ मध्ये लोन घेऊन मोठ्या स्तरावर काम करण्यास सुरूवात केली.

तेल तयार करण्यासाठी त्यांनी घरगुती पद्धती वापरल्या होत्या. त्यांनी सोशल मिडीया मार्केटींगही केली होती. तेथूनही त्यांना तेलाच्या ऑर्डर येत होत्या. त्यानंतर त्यांनी स्वताचे पोर्टल सुरू केले. त्यानंतर त्यांनी ऍमेझॉन आणि बाकी शॉपिंग साईट्सवर टाईअप केले.

दर महिन्याला ५०० पेक्षा जास्त ऑर्डर त्यांना येत असतात. भारतातल्या प्रमुख राज्यात तसेच विदेशातही त्यांच्या तेलाला मोठी मागणी आहे. सध्या त्यांच्या हाताखाली १० महिला काम करतात. त्यातून त्यांनी आता करोडो रूपये कमावले आहेत.

महत्वाच्या बातम्या
डॉ. पेयोच्या नावाने प्रसिद्ध आहे हा घोडा, कॅन्सरपिडीत रूग्णांचे दु:ख करतो दूर
शिक्षकाने तयार केला शालू नावाचा रोबोट; ४७ भाषा बोलण्यात तरबेज, लोकांशीही साधणार संवाद
..त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक, तज्ञांनी सांगितले धक्कादायक कारण
मुंबई पालिकेचे कौतुक करत सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला झाप झाप झापले, म्हणाले..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.