अंगावर साडी अन् डोक्यावर पदर; पहा या महिलेची लक्झरी ड्रायव्हिंग

आता सगळीकडेच महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा चालत आहेत. असे कोणतेच क्षेत्र नाहीये, ज्याठिluकाणी महिला दिसत नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच एका महिलेबद्दल सांगणार आहोत, जी संसाराचा गाडा चावण्यासाठी दिवसरात्र मेहनत करताना दिसून येत आहे.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. त्यामध्ये एक महिला लक्झरी चालवताना दिसून येत आहे. या व्हिडिओमध्ये महिला वोल्वो लक्झरी चालवताना दिसते. यावेळी तिचा आत्मविश्वास हा बघण्यासारखा आहे.

ही महिला भुवनेश्वर येथे लक्झरी चालवताना दिसत आहे. त्यामध्ये रस्ता कसाही असो मोकळा असो वा गर्दी असलेला ती महिला व्यवस्थितपणे चालवताना दिसत आहे. विशेष म्हणजे ड्रायव्हिंग करत असतानाही तिने तिचा पारंपारिक पेहराव सोडलेला नाही.

या व्हिडिओमध्ये ती महिला साडी घालून आणि डोक्यावर पदर घेऊन गाडी चालवताना दिसत आहे. व्यवसाय कोणताही करताना आपल्याला आपली संस्कृती जपता येऊ शकते, असा संदेश त्या महिलेने या व्हिडिओमधून दिला आहे.

सोशल मीडियावर या महिलेचे खुप कौतूक केले जात आहे. संसाराचा गाडा ओढण्यासाठी महिला काहीही करु शकते, हे या महिलेने दाखवून दिले आहे. हा व्हिडिओ झिरो फाईव्ह नावाच्या चॅनलने युट्युबवर अपलोड केला आहे.

महत्वाच्या बातम्या-
रतन टाटा देखील ‘या’ २८ वर्षाच्या तरुणाकडून घेतात सल्ला, जाणून घ्या कारण…
‘देवमाणूस’मधला ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता अजूनही चालवतो रिक्षा; कारण वाचून डोळे पाणावतील 
शेवटच्या क्षणापर्यंत एकमेकासोबतच..; आजी आजोबांचा व्हिडीओ पाहून डोळ्यात पाणी येईल
अजब प्रेम की गजब कहाणी! १०वी नापास रिक्षावाला प्रेमात पोहचला थेट स्वित्झर्लंडला

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.