खतरनाक! सुपरमार्केटमध्ये महिलेने फोडल्या ५०० दारूच्या बाटल्या, पहा व्हिडिओ

असे म्हटले जाते की राग एखाद्याला वेडा बनवितो. हे अगदी बरोबर आहे. याच रागामुळे ब्रिटनमधील एका महिलेने लाख रुपयांचे नुकसान केले. हे प्रकरण इंग्लंडच्या स्टीव्हनेज येथील आल्डी सुपरमार्केटचे आहे. या महिलेने सुमारे ५०० दारूच्या बाटल्या फोडल्या असल्याचे सांगण्यात येत आहे.

या ५०० बाटल्यांची किंमत साधारण १३०,००० डॉलर सांगितली जात आहे. भारतीय करन्सीनुसार ही रक्कम ९५ लाख रूपये इतकी होते. घटना इंग्लंडमधील अल्दी सुपरमार्केटमधील असल्याचं सांगितलं जात आहे. या महिलेनं या बाटल्या का फोडल्या याचं कारण अद्याप समोर येऊ शकलं नाही मात्र या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

ह्या व्हिडीओत दिसत आहे की, कशाप्रकारे एक महिला धडाधड दारूच्या बाटल्या फोडत आहे. या महिलेच्या मागे सर्व दारूच्या फुटलेल्या बाटल्या दिसत आहेत. इतकेच नाही तर हे करत असताना महिलेच्या हातालाही इजा झाली आहे. सुपरमार्केटमध्ये हजर असलेल्या व्यक्तीने सांगितले की, आजपर्यंत त्याने असं कधी पाहिलं नाही.

तिने हे का केलं याचं कारण समजू शकलेलं नाही. परंतु हा व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या महिलेला पोलिसांनी अटक केली असून चौकशी सुरू आहे.

बॉलीवूड आणि साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील ‘या’ हॉट आणि ग्लॅमर्स अभिनेत्रीने दिला बॉयफ्रेंडच्या बाळाला जन्म

विराटने पराभवाचे खापर फोडले टिमवर; हार्दीक पांड्याबद्दलही आहे नाराज..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.