आईची माया! ऑक्सिजनवर असलेली ती माऊली करतेय स्वयंपाक; फोटो पाहून तुम्ही कराल कौतूक

नवी दिल्ली | आई म्हणजे एक देवाचच रुप आहे. जगात आपल्या मुलांवर आई इतकं प्रेम कुणीही करू शकत नाही. मुलाबाळांबरोबरच संपुर्ण कुटूंबाची जबाबदारी आईकडे असते. आईचं प्रेम शब्दात व्यक्त करताना अनेकांना अश्रू अनावर होतात.

आई आपल्या मुलांना चांगले संस्कार देत असते. आपल्या मुलांनी खुप मोठं व्हावं असं प्रत्येक आईला वाटत असते. निस्वार्थ प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे आई असते. आई मुलांना आवडीचे पदार्थ बनवून खायला घालत असते.  आजारी असली तरीही ती मुलं उपाशी राहू नये याची काळजी घेत असते.

सोशल मिडियावर आईबद्दल गाणं, कविता, गोष्टी पाहायला मिळतात. आईबदद्ल सांगताना अनेकांचे डोळे पाणावले आहेत. सोशल मिडियावर आई मुलांच्या प्रेमाचे अनेक फोटो, व्हिडिओ व्हायरल होत असतात. असाच एक फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे

कोरोना महामारीने देशात हाहाकार माजवला आहे. कोरोनामुळे अनेकांना ऑक्सिजनची गरज भासत आहे. एका ट्विटर युजर्सने एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये एक महिला ऑक्सिजन लावून स्वयंपाक करत आहे.

फोटोमध्ये पाहू शकता, स्वयंपाक घरात एक महिला गॅसजवळ उभी आहे. शेजारी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर दिसत आहे. त्या महिलेला ऑक्सिजन लावलेला आहे. महिला चपाती करत  असल्याचं दिसून येत आहे. फोटोवर निस्वार्थ प्रेम ‘आई’ कधीही कर्तव्य सोडत नाही. असं कॅप्शन दिलं आहे.

सोशल मिडियावर फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी आईचं किती प्रेम असतं याबद्दल सांगितलं आहे. तर काहींनी आई आजारी असतानाही काम करायला लावत आहे. असं म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या
जुही चावलाने केला मोठा खुलासा; म्हणाली, ‘तेव्हा’ मी सलमानला रिजेक्ट केले होते
क्रुरतेचा कळस! हातपाय बांधून दलित तरूणाला पोलिसाकडून मारहाण, पाणी मागितले तर पाजले मुत्र
मालिकेसोबत नायरा खऱ्या आयूष्यात देखील आहे करोडोंच्या संपत्तीची मालकिण

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.