VIDEO: धक्कादायक! मास्क न घातल्यामुळे पोलिसांनी महिलेला खाली पाडून, केसांना धरुन केली मारहाण

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात धूमाकूळ घातला आहे. दिवसाला लाखोंच्या संख्येत रुग्ण सापडत आहे. त्यामुळे विविध राज्यात कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात येत आहे.

अशात लॉकडाऊन केल्यानंतरही अनेक लोकं नियमांचे उल्लंघन करताना दिसून येत आहे. त्यामुळे पोलिस त्या लोकांवर कारवाई करत आहे. अशात पोलिसांनी केलेल्या कारवाईचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेक ठिकाणी तर पोलिस लोकांवर दादागिरी करतानाही दिसून येत आहे.

आता पोलिसांच्या खात्याला काळिमा फासणारा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एका महिलेने मास्क न घातल्यामुळे तिला जाब विचारत महिला कॉन्स्टेबलने मारहाण केली आहे. इतकेच नाही, तर त्या महिलेला खाली पाडून तिचे केसही खेचत आहे.

ही घटना मध्य प्रदेशमध्ये आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. हा व्हिडिओ वरिष्ठांपर्यंत पोहचला असता त्या महिला कॉन्स्टेबलला तसेच सहय्यक उपनिरीक्षकाला तात्काळ निलंबित करण्यात आले आहे.

या व्हिडिओमध्ये महिला कॉन्स्टेबलसोबतच काही पोलिस कर्मचारी महिलेला मारहाण करताना दिसत आहे. तसेच संबिधत महिलेला खाली पाडून मारहाण करतानाही दिसत आहे. दरम्यान, या कॅमरामध्ये पुर्ण घटना कैद झाली नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

सागर जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आलेले आहे. तरीही संबंधित महिला विनामास्क भाजी घेण्यासाठी बाहेर पडली होती. त्यामुळे पोलिसांनी तिला अडवले होते. सुरुवातील त्या महिलेने कॉन्स्टेबलला मारहाण केली होती. या व्हिडिओमध्ये एकच बाजू समोर आली आहे. असे राहीलचे पोलिस उपविभागीय अधिकारी कमल सिंग यांनी म्हटले आहे. आधी महिलेने पोलिसांवर हल्ला केला होता, नखांनी पोलिसांच्या चेहऱ्यावर जखमा केल्या असा आरोप पोलिसांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

अभिनेत्री गौहर खान उतरली पॅलेस्टाईनच्या समर्थनात, इस्त्रायलला धडा शिकवण्यासाठी केले ‘हे’ आवाहन
पावसामुळे रोड खचला आणि संपूर्ण ट्रक खड्ड्यात गेला, पाहा विडिओ
मी हे खपवून घेणार नाही; लग्नाच्या पोस्टवर घाण कमेंट करणाऱ्यांना सोनाली कुलकर्णीची थेट धमकी

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.