सूनेने केली सासूला जबर मारहाण, मुलगा बघतच राहीला; सूनेच्या या घाणेरड्या कृत्यावर नेटकरी संतापले

सासू सुनेचे वाद आपल्याला बऱ्याच घरात दिसून येतात. पण कधी कधी हे वाद इतक्या टोकाला जातात की त्यातून अनेक विचित्र घटनाही समोर येत असतात. आताच एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

आपल्यापेक्षा दुप्पट वय असलेल्या व्यक्तीच्या कानशिलात मारण्याचा विचार करणेही शक्य नाही. पण अशीच एक घटना हरीयाणाच्या गुरुग्राम शहरात घडली आहे. एका सुनेने आपल्या सासूला मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.

व्हिडिओमध्ये सासू आधीपासून रडताना दिसून येत आहे. त्यावेळी घरात लहान मुलांचा रडण्याचा आवाजही येत आहे. अशाच संतापलेली सून आपल्याला पतीला धमकी देत सासूला मारहाण करताना दिसन येत आहे. हा सर्वप्रकार तिच्या नवऱ्याने कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

संबंधित व्हिडिओ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर खुप व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दिसून येणाऱ्या सासूचे नाव अंशू जिंदल असे आहे. त्यांचे वय जास्त असल्यामुळे घरातील कामे त्यांना जमत नव्हती, त्यामुळे त्यांनी एका महिलेला आपल्या घरातील कामासाठी बोलावले होते, याच प्रकरणावरुन वाद झाला आहे.

आपल्याला न विचारता घरकामासाठी महिलेला बोलावलंच कसं? या गोष्टीवरुन सून खुपच संतापली आहे. तसेच तिने या छोट्याशा गोष्टीवरुन चांगलाच गोंधळ घातला आहे. इतकेच नाही, तर सासूला मारहाणही केली आहे.

सूनेचे नाव कविता असून तिने आपल्या सासूलाच मारहाण केली आहे. बायकोचा हा माज लोकांसमोर यावा, त्यामुळे तिच्या पतीने ही व्हिडिओ काढली आहे. सोशल मीडियावर ही व्हिडिओ व्हायरल झाली असून लोकांनी सूनेचे या वागण्यावर संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान, या प्रकरणी पीडित सासूने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अंशू यांना मारहाण केल्यामुळे त्यांच्या शरीरावरही गंभीर जखमा झालेल्या दिसून येत आहे. पोलीसांनी सूनेविरोधात गुन्हा दाखल करून घेतला असून पुढील तपास सुरु आहे.

महत्वाच्या बातम्या-

मोठी बातमी! भारतीय रेल्वेत मोठे बदल होणार, खाजगी कंपन्या भाड्याने घेणार रेल्वे
“तीन पक्षाचं सरकार सांभाळणं ठाकरे सरकारचा प्राधान्यक्रम, त्यामुळे महिला सुरक्षा वाऱ्यावर उडाली”
मोदी शहांचे पुन्हा धक्कातंत्र! भूपेंद्र पटेल गुजरातचे नवे मुख्यमंत्री; जाणून घ्या कोण आहेत भूपेंद्र पटेल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.