VIDEO: वर्दी उतरवून टाकेल म्हणत तरुणीने पोलिसाला मारली लाथ; कारचे चलन कापल्यामुळे तरुणीचा हाय व्हॉल्टेज ड्रामा

सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. पण गेल्या काही दिवसांपासून महिला आक्रमक होत असल्याचे व्हिडिओ समोर येत आहे. गरज नसतानाही महिला आक्रमक होत असल्यामुळे नेटकऱ्यांकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे.

नुकताच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये एक तरुणी एका तरुणाला मारहाण करत असल्याचे समोर आले होते. असे असतानाच आता आणखी एका आक्रमक तरुणीचा व्हिडिओ समोर आला आहे. आपल्या लक्झरी कारचे चलन कापल्यामुळे ती पोलिसांनाच धमकवत असल्याचे व्हिडिओमधून समोर आले आहे.

संबंधित व्हिडिओ हा उत्तराखंडमधला आहे. एक महिला नैनितालमधल्या एका पोलिस कर्मचाऱ्यासोबत गैरवर्तन करताना दिसत आहे. सध्या या तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

एका तरुणी लक्झरी कारमधून आपल्या मित्रांमोबत फिरत आहे. पण पोलिसांनी तिला पकडले आहे. त्यानंतर ती तरुणी आपल्या लक्झरी कारमधून उतरत पोलिसांनाच धमकी देत असल्याचे दिसून येत आहे. एवढंच नाही, तर पोलिसांसोबत चुकीचे वर्तवणूक करत त्यांना लाथही मारली आहे.

पोलिसांनी लक्झरी कारची काच काळी असल्याचे सांगत चलन कापले आहे. यावेळी तरुणीने रस्त्यावर चांगलाच हाय व्हॉल्टेज ड्रामा केला आहे. चलन कापल्यामुळे तरुणी चांगलीच तापली होती, त्यामुळे गाडीतून उतरुन थेट भांडण करण्यास सुरुवात केली होती.

कारवरती काळी फिल्म होती, ती काढण्याच्या मुद्यावरुन पोलिस त्या तरुणीला बोलत होते, पण तरुणीने पोलिसांसोबत गैरवर्तवणूक करत त्यांना लाथ देखील मारली आहे. तसेच पोलिसांना वर्दी काढण्याची धमकीही दिली आहे. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

महत्वाच्या बातम्या-

पिंपरीतील अन्वीला रोहित पवारांचा मदतीचा हात; उपचाराचा निधी उभारण्यासाठी लोकांना केली विनंती
आता राज्यात किराणा दुकानातही मिळणार वाईन, शरद पवारांची ईच्छा उद्धव ठाकरे करणार पूर्ण
काजू , बदाम आणि अक्रोड भिजवून खात असाल तर हा लेख वाचा; आरोग्यास होणारा धोका टळेल…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.