काय सांगता! ATM मध्ये १४०० रुपये काढायला गेलेल्या महिलेला लागली कोट्यावधीची लॉट्री, जाणून घ्या….

जर तुम्हाला एक दिवस असे समजले की तुमच्या बँकेच्या अकाउंटमध्ये करोडो रुपये आहेत. तर तुम्हाला विश्वास बसणार नाही. तुम्ही म्हणाल की असे कधी होत नाही, असे कधी खरे होत नाही फक्त स्वप्नातच होते. मात्र अशी एक गोष्ट एका व्यक्ती बरोबर खरोखरच घडली आहे.

अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये गेल्या शनिवारी एका महिलेवर अशी घटना घडली की, त्यामुळे तिला ही धक्काच बसला. लार्गो येथे ज्युलिया योनकोव्स्की काही पैसे काढण्यासाठी एका स्थानिक चेस बँकेत गेली पण त्याआधी तिने तिचा अकाउंट बँलेंस चेक केला.

त्यावेळी तिला धक्कादायक माहिती मिळाली. एटीएममधून प्राप्त झालेल्या बँक पावतीनुसार ज्युलिया योनकोव्स्कीच्या खात्यात $९९९,९८५,८५५.९५ म्हणजेच ७४१७ कोटींपेक्षा जास्त रुपये होते. तिला हे जाणून आश्चर्य वाटले की, तिच्या खात्यात इतके पैसे कुठून आले म्हणून.

जूलिया फक्त २० डॉलर्स काढण्यासाठी एटीएममध्ये गेली होती. त्यावेळी २० डॉलर काढण्यासाठी मशीनकडून त्यांना इशारा देण्यात आला की, तुम्हाला हे पैसे मिळतील परंतु त्यासाठी तुम्हाला चार्जेस द्यावे लागतील. तिने अशा घोटाळ्यांविषयी ऐकले होते, ज्यामुळे तिने कोणताही व्यवहार केला नाही.

जूलियाने सांगितले की, मला यासाठी भीती वाटली कारण हा सायबर क्राइमही असू शकतो. जूलिया अब्जाधीश झाली आहे हे समजताच तिने चेस बँकेच्या एटीएममध्ये जाऊन अनेक वेळा तपासणी केली. नंतर दोन दिवसानंतर, अब्ज डॉलर्सची ही अनोखी कथा चेस बँकेने बंद केली.

बँकेच्या अधिकाऱ्यांनी WFLA या न्यूज वेबसाइटला माहिती दिली की, ज्युलियाचे बँक अकाउंट बॅलेंस आधीच निगेटीव्हमध्ये होते. कोणत्याही बँक खात्यात संशयास्पद घटना घडल्यास अशा प्रकारचे नंबर्स वापरले जातात, अशी माहितीही त्यांनी दिली. त्यामुळे तुमच्या बरोबरही असे काय झाले तर योग्य ती पडताळणी करणे गरजेचे आहे.

ताज्या बातम्या

काय म्हणावं हिला! 264 झूम मिटिंगला महिलेनं घातलं एकच शर्ट, स्वतः केला गोष्टीचा खुलासा

नागपुरमध्ये मित्राने केली फिल्मी स्टाईलमध्ये तरुणाची हत्या; हत्येचा लाईव्ह व्हिडिओ व्हायरल

धक्कादायक! पत्नीने भरपंचायतमध्ये पतीला मारली गोळी; कारण वाचून बसेल धक्का

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.