धक्कादायक! महिलेवर 143 जणांचा बलात्कार; पोलिसांनी केला तब्बल 42 पानी FIR दाखल

हैदराबाद : हैदराबादमध्ये खळबळजनक घटना समोर आली आहे. एका २५ वर्षीय पीडितेने पोलिसांना सांगितल्यानुसार तिच्या आयुष्यात वेगवेगळ्या घटनांत 143 लोकांनी अनेकदा बलात्कार, अतिप्रसंग केले आहेत.

धक्कादायक बाब म्हणजे त्या पीडित महिलेने 143 लोकांनी अनेकदा बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी 42 पानांचा FIR (42 Pages FIR) नोंदविला आहे.

तसेच या प्रकरणी हैदराबादच्या पुंजागुट्टा पोलिसांनी 42 पानांचा एफआयआर नोंदविला आहे. या पानांमध्ये या 143 लोकांची माहिती आहे. या लोकांविरोधात पीडितेने बलात्कार केल्याचा आरोप लावला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार लग्नानंतर या महिलेवर पतीने आणि तिच्या सासरच्यांनी लैंगिक अत्याचार केले व मारहाणही केली. यानंतर तिने तलाक घेतला. तलाक घेतल्यानंतर तिने पुढील शिक्षणासाठी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. मात्र, तिथेही तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचा आरोप केला आहे.

दरम्यान, आता पोलीस या सर्व आरोपींची चौकशी करणार आहे. यामध्ये काही महिलाही सहभागी आहेत. पीडितेला वैद्यकीय चाचणीसाठी पाठविण्यात आले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.