महिलेने नग्नावस्थेत निवृत्त मुख्याध्यापकांना केला व्हिडिओ कॉल; पुढे घडला ‘हा’ धक्कादायक प्रकार

मुंबई । मुंबईत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील दक्षिण मुंबईतील एका शाळेतील निवृत्त मुख्याध्यापकांना एका महिलेने नग्नावस्थेत व्हिडिओ कॉल करून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. यामुळे मुख्याध्यापकांना हे काहीसे वेगळे प्रकरण असल्याचे दिसून आल्याने त्यांनी याबाबत तक्रार दाखल केली.

त्यांच्याकडून खंडणीस्वरूपात पैसे उकळण्याचेही प्रयत्न केले. आरोपी महिलेने त्यांना सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करणार असल्याचे सांगून त्यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार दाखल करण्याचीही धमकी दिली होती. मात्र पोलिसांनी तिला अटक केली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सोशल मीडियाच्या माध्यमातून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्यानंतर तिने त्यांचा संपर्क क्रमांक मागितला. तो मिळवल्यानंतर तिने त्यांना नग्नावस्थेत व्हिडिओ कॉल केला. मात्र ही महिला आपल्याला पुढे ब्लॅकमेल करेल असे त्यांना वाटले नव्हते.

महिलेने व्हिडिओ कॉल रेकॉर्ड करून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार करण्याची धमकी दिली. यामुळे हे प्रकरण वाढत गेले.

याबाबत निवृत्त मुख्याध्यापकांनी खार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मुख्याध्यापक निवृत्त झाल्यानंतरही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांच्या संपर्कात आहेत. या महिलेने त्यांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. मात्र त्यांनी ती स्वीकारली नाही.

त्यानंतर तिने तिचा संपर्क क्रमांक शेअर केला आणि मला तातडीने महत्वाचे बोलायचे आहे, असे ती म्हणाली. त्यानंतर काही महत्वाचे असेल असे वाटल्यानंतर त्यांनीही संपर्क क्रमांक दिला. नंतर तिने थेट व्हिडिओ कॉल केला आणि त्यावेळी ती नग्नावस्थेत होती.

यामुळे त्यांनी कॉल कट केला. नंतर तिने मोबाइलमध्ये २४९ रुपयांचा रिचार्ज करण्यास सांगितले. दोन-तीन वेळा कॉल केला. मात्र, त्यांनी काहीच प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर तिने व्हिडिओ रेकॉर्ड केले असून, त्यांच्या पत्नीला आणि मुलांना पाठवण्याची धमकी दिली. यामुळे मुख्याध्यापकांना हे काहीसे वेगळं असल्याचे दिसून आले.

महिलेने बलात्काराची तक्रार दाखल करणार असल्याचे देखील म्हटले. यामुळे मुख्याध्यापकांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. आता गुन्हा दाखल करून सायबर सेलच्या मदतीने तपास सुरू केला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.