पतीपासून घटस्फोट झाल्यानंतर अमांडा यांनी आपल्याच कुत्र्याशी लग्न केले आहे. त्यातही हे लग्न लपून छपून केले नसून चांगलेच गाजत वाजत केले आहे. २०० लोकांच्या साक्षीने, थाटामाटात हे लग्न पार पडले आहे.
ही घटना घडली लंडनमध्ये घडली असून, हे लग्न सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. सध्या सोशल मीडियावर अशा अनेक बातम्या व्हायरल होतांना दिसत असतात. परंतु ही व्हायरल झालेली बातमी खरी आहे.
या महिलेने आपल्याच पाळीव कुत्र्याशी लग्न केले आहे. व्हायरल झालेल्या या बातमीवर नेटकऱ्यांनी चांगल्याच प्रतिक्रिया दिल्या आहेत, असे स्वतः अमंडा यांनी सांगितले. तसेच अमंडा यांना कुत्र्याच्या डोळ्यात प्रेम दिसते असे त्यांचे मत आहे.
अमंडा रोजर्स असे या महिलेचे नाव असून त्या ४९ वर्षांच्या आहे. लंडन येथील रहिवासी असून या महिलेने क्रोएशियातसुद्धा वास्तव्य केलेले आहे. पतीसोबत घटस्फोट झाल्याने आता कुत्र्याशी लग्न केले. इतकेच नव्हे तर या लग्नाने ही महिला खुश असल्याचाही दावा करत आहे.
हे लग्न अमंडा यांनी लपून छपून केले नाही. तर या लग्नात २०० वऱ्हाडी, सजावट सगळंच काही होते. फक्त नवरदेवाच्या खुर्चीवर कुत्रा होता. बाकी सगळे नॉर्मलच होते. सगळ्या प्रथा जशा होत्या तशा पाळल्या गेल्यात.
अमंडा रोजर्स यांनी २०१४ मध्ये त्यांच्या पतीसोबत घटस्फोट घेतल्याचे कळाले आहे.आणि आता कुत्र्यासोबत लग्न केले. मिळालेल्या माहितीनुसार अमंडा यांनी कुत्र्याचे नाव शेबा असे ठेवले आहे. शेबा दोन महिन्याचे असल्यापासूनच अमंडा यांनी त्याचा सांभाळ केला आहे. जे प्रेम नवऱ्याकडून मिळाले नाही ते शेबाकडून मिळतंय असे अमंडा यांनी एका मुलाखतीत सांगितले आहे.