नगरमध्ये महिलेने शेतात सापडलेला बॉम्ब मुलाकडे दिला, अन पुढे जे झालं त्यानं अख्ख नगर हादरल

अहमदनगर । अहमदनगर जिल्ह्यात आज एक धक्कादायक घटना घडली आहे. अहमदनगर जिल्ह्यात नारायनडोह गावाजवळील एका वस्तीच्या रस्त्यावर जुन्या काळातील बॉम्बचा स्फोट झाला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे।.

यामध्ये स्फोटात एक महिला आणि तरुण दोघेजण जखमी झाले आहेत. बाबासाहेब रामराव फुंदे यांच्या वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर टाकण्यात आलेल्या मुरुमात पिन असणारा हॅन्ड ग्रेनेड मिळाला आहे. याबाबत आता पोलीस तपास करत आहे.

याबाबत माहिती अशी की शेतात काम करत असताना एका महिलेस बॉम्ब गोळा सापडला. त्या महिलेने तो बॉम्ब गोळा जवळ असणाऱ्या मुलाकडे दिला. त्या मुलाने तो बॉम्बगोळा जमीनीवर आपटला. यावेळी मोठा स्फोट झाला. यात शेतात कामावर असणारा अक्षय साहेबराव मांडे हा मुलगा व शेत मालकाची पत्नी मंदाबाई फुंदे दोघे जखमी झाले.

हा स्फोट झाल्याने मोठा आवाज झाला होता, यामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले होते. या बॉम्बच्या स्फोटाचा आवाज २ ते ३ किलोमीटरपर्यंत गेल्याने परिसरात दहशतीचे वातावरण तयार झाले.

यावेळी नागरिकांनी गर्दी केली होती. अजून काही बॉम्बस्फोट होतील अशी देखील अफवा परिसरात पसरली होती. यामुळे नागरिक भयभीत झाले होते. यामुळे काहीवेळ झाले आहे हेच कोणाला समजत नव्हते.

घटनास्थळी नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी पोलीस पथकासह भेट दिली. यानंतर गुरुवारी घटनास्थळाची बॉम्ब शोधक पथकाने पाहणी केली.

ताज्या बातम्या

आदर पुनावालांना राजकीय नेत्यांकडून मुंडकं छाटण्याच्या धमक्या; पुनावालांनी स्वत:च दिली माहीती

फौजी नवऱ्याने हुंड्यासाठी प्रेग्नेंट बायकोसोबत केले असे काही, वाचून बसेल धक्का…

पतीला सोडून मी दुसऱ्या पुरुषासोबत रिलेशनमध्ये आहे पण…; अभिनेत्रीचा खुलेआम गौप्यस्फोट

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.