Homeइतरमास्क न घातल्यास ५०० रूपये तर सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास १००० रूपये दंड-...

मास्क न घातल्यास ५०० रूपये तर सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास १००० रूपये दंड- अजित पवार

कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने महाराष्ट्रात धुमाकूळ घातलेला आहे. त्यातल्या त्यात पुण्यात कोरोनाचे आणि ओमिक्रॉन दोन्ही रुग्ण सापडत आहेत. पुण्यात दिवसभरात कोरोनाचे ११०४ रुग्ण सापडले आहेत. या महिन्यातील हा उच्चांकी दर आहे त्यामुळे ही चिंतेची बाब आहे. कोरोना रुग्ण झपाट्याने वाढल्याने आता हळू हळू निर्बंध लावण्यास सुरूवात झाली आहे.

याच पार्श्वभुमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. बैठक झाल्यानंतर पत्रकार परिषदेत अजित पवारांनी पुण्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा बंद करण्याचा निर्णय जाहीर केला. पण त्यांचे ऑनलाईन क्लास सुरूच राहतील असे अजित पवार म्हणाले.

तर नववी आणि दहावीचे वर्ग हे ऑफलाईनच सुरू राहतील असंही अजित पवार यांनी जाहीर केलं आहे. मास्क न घालणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असंही अजित पवार म्हणाले. जे मास्क घालणार नाहीत त्यांना ५०० रूपये दंड भरावा लागेल. तसेच जे लोक मास्क न घालता सार्वजनिक ठिकाणी जे थुंकतील त्यांना १००० रूपये दंड भरावा लागेल असंही अजित पवार म्हणाले.

तसेच पुणे शहरात आणि पिंपरी चिंचवड शहरात कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेले नसल्यास शासकीय कार्यालये, हॉटेल्स, उपहारगृहे, बस या ठिकाणी प्रवेश मिळणार नाही. जर हे नियम पाळले नाहीत तर निर्बंध लावणार असल्याचा इशारा अजित पवारांनी यावेळी दिला. अजित पवारांसोबत आरोग्यमंत्री राजेश टोपेही उपस्थित होते.

त्यांनीही पुणे जिल्ह्यात नो व्हॅक्सिन नो एन्ट्रिची अंमलबजावणी केली. येत्या २० ते २५ दिवसात राज्यात कोरोनाचा विस्फोट होण्याची शक्यता आहे असेही ते म्हणाले. अजितदादा असेही म्हणाले की, कोरोनाची स्थिती बिकट होत आहे. पुणे जिल्ह्यात ७४ टक्के लोकांचं लसीकरण झालं आहे. राहिलेल्या नागरिकांनी लवकर लस घ्यावी. लोकांना विनंती आहे की कठोर निर्णय घेण्यास भाग पाडू नका.

पुणे जिल्ह्यात पॉझिटिव्हिटी रेट १८ टक्के झाला आहे. त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे. पुणे शहरात ३ हजार ९५० सक्रीय रुग्ण आहेत. १५ ते १८ वयोगटातील मुलांचे ४ टक्के लसीकरण झाले आहे. पालक आणि विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे, असं अजित पवार म्हणाले.