ऑक्सिजन सिलेंडर न मिळाल्याने शेतात झाडाखाली जाऊन बसला; अन् ३ दिवसातच कोरोनाला हारवून आला

पानीपत | देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. कोरोना रुग्णसंख्येमुळे आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. रुगणांना ऑक्सिजन, बेडसाठी धावपळ करावी लागत आहे. ऑक्सिजन, बेड लवकर उपलब्ध न झाल्याने अनेक रुग्णांनी जीव गमावले आहेत.

आजवर अनेकांनी औषधांबरोबरच रोगप्रतिकार शक्तीच्या जोरावर न घाबरता कोरोनावर मात केली आहे. अनेकांनी रुग्णालयात भरती न होता घरीच राहून कोरोनाला हारवले आहे. पानीपतमधील अशाच एका तरूणाने शेतात झाडाखाली राहून कोरोनावर मात केली आहे.

पानीपत जिल्ह्यातील नंगला गावातील प्रदीप सिंह नावाचा तरूण एका खाजगी कंपनीत काम करतो. प्रदीपला  कोरोनाची लक्षणे जाणवू लागली होती. यानंतर ३ मे रोजी तपासणी केल्यानंतर प्रदीपचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला.

कोरोनामुळे प्रदीपची ऑक्सिजनची  पातळी ८० पर्यंत घसरत चालली होती. प्रदीपला ऑक्सिजनची गरज होती. ऑक्सिजन सिलेंडरसाठी प्रदीपने खुप प्रयत्न केले.  मात्र कुठेही त्याला ऑक्सिजन सिलेंडर मिळाला नाही. रुग्णालयात उपचारासाठी जागा मिळत नसल्याने प्रदीपने घरीच शेतात राहण्याचं ठरवलं

प्रदीप सिंहचं डोकं दुखत होतं. तसेच त्याला श्वास घेण्यासही त्रास होत होता. प्रदीप शेतात जाऊन एका झाडाखाली राहू लागला. यानंतर फक्त ३ दिवसातच प्रदीपला बरं वाटू लागला. त्याची ऑक्सिजन पातळीही सामान्य झाली.

प्रदीप १० दिवस शेतात राहिला. रोज ८ ते १० तास शेतात झाडाखाली एका पलंगावर झोपून आराम करत होता.  कोरोनातून बरं होत असल्याचं पाहून प्रदीपमधील आत्मविश्वास वाढला. यानंतर १३ मे ला कोरोनाची चाचणी केल्यावर रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.

आर्य डिग्री कॉलेजचे डॉ. बलकार सिंह म्हणाले, आमच्या पुर्ण कुटूंबाला कोरोनाची लागण झाली होती. गोळ्या औषधांबरोबर आम्ही जास्त वेळ शेतात झाडांखाली घालवला. शहरापेक्षा ग्रामीण भागामध्ये वातावरण चांगलं असतं. गावांमध्ये प्रदुषण कमी असतं.

महत्वाच्या  बातम्या-
लाखो कोरोना रुग्णांचा ऍलोपॅथीमुळे मृत्यु झाला आहे; बाबा रामदेव यांचे खळबळजनक वक्तव्य
माझ्या पार्थिवाला माझ्या पत्नीने अग्नी द्यावा आणि…; शेवटची इच्छा व्यक्त करत तरुणाने घेतली फाशी
राज्य लस खरेदी करणार, मग मोदींचा फोटो का छापायचा? राज्यांनी मोदींचा फोटो हटवला

 

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.