सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे आता गाडीमध्ये स्टेपनी ठेवायची गरज नाही

दिल्ली | मागील काही दिवसांपासून रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने अनेक नियमांमध्ये बदल आणि दुरुस्ती जारी केले आहेत. आता मंत्रालयाने एक नवीन गाईडलाईन्स जारी केल्या आहेत.

ही गाईडलाईन टायरमधील हवेसंबंधी आहे. याविषयी सविस्तर जाणून घ्या. मंत्रालयाने जारी केलेल्या गाईडलाईननुसार मोटार वाहन कायद्यामध्ये संशोधन करण्यात आले आहे. या अधिकांश ३.५ टन वजनपर्यंतच्या वाहनांसाठी टायर प्रेशर मोनिटरिंग प्रणाली सुचवली आहे.

या प्रणालीद्वारे सेन्सरद्वारे गाडीच्या टायरमधील हवेबाबत ड्रायव्हरला माहिती मिळते. हवा कमी असल्यास गाडीमध्ये डॅशबोर्डवर ड्रायव्हरला माहिती मिळेल.

हवा कमी असल्यास गाडीवरील डॅशबोर्डवर ड्रायव्हरला अलर्ट केले जाईल. यामध्ये रस्ते सुरक्षेसाठी वाढ होईल. सोबतच सरकारने टायर दुरुस्ती किटचीदेखील शिफारस केली आहे.

या किटमध्ये ट्युबलेस टायर पंचर झाल्यावर दुरुस्ती किटच्या साहाय्याने सिलेंटला टायर ट्रेंडमध्ये पंचर झालेल्या ठिकाणी एअर सिलसोबत लावले जाते. त्यामुळे आता स्टेपणीची आवश्यकता भासणार नाही.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.