दत्ताकाकाच्या जाण्याने आपण जवळचा मित्र गमावला; विलास लांडेंनी व्यक्त केल्या भावना

 

पिंपरी। पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक दत्ता साने यांचे आज कोरोनामुळे निधन झाले आहे. वयाच्या अवघ्या ४७ व्या वर्षी त्यांना हे जग सोडून निघून जावे लागले आहे.

दरम्यान माजी आमदार विलास लांडे यांनी साने यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. तसेच आपण एक जवळचा मित्र गमावल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

त्यांच्या कुटुंबियांना आणि मित्र परिवाराला हे दु: ख पचवण्याची ताकद ईश्वर देवो, अशी प्रार्थना त्यांनी केली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेत साने सलग तीन कार्यकाल नगरसेवक होते.

विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारीही त्यांनी चोक पार पडली होती. महापालिकेच्या ‘अ’ क्षेत्रीय कार्यालय समितीचे ते माजी अध्यक्ष होते. एक झुंझार, आक्रमक व अभ्यासु कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती.

भोसरी मतदारसंघातुन निवडणूक लढविण्यासाठी ते इच्छुक होते. दत्ता साने यांना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही ट्विटरच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण केली आहे.

तर दुसरीकडे सध्या कोरोनाने ग्रासलेले आणि रूग्णालयात उपचार सुरू असलेले भाजपचे आमदार महेश लांडगे यांनीही साने यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. “धक्कादायक.. माझे सहकारी-मित्र-मार्गदर्शक दत्ताकाका साने यांना भावपूर्ण श्रद्धांजली”, असे ट्विट लांडगे यांनी केले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.