भविष्यातील गरजा लक्षात घेऊन, पहिले विकासकामे मार्गी लावा; अजित पवारांनी दिल्या सूचना 

बारामती | उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  बारामती येथे विविध ‍ठिकाणी सुरु असणाऱ्या विकासकामांची प्रत्यक्ष ठिकाणी भेट देवून पाहणी केली.

शहरासह तालुक्यात सुरु असलेली विकासकामे करताना भविष्यातील गरजा लक्षात घेऊन, प्राधान्याने विकासकामे मार्गी लावण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्या.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  कृषी उत्पन्न बाजार समिती जळोची, माळेगाव व मेडद येथे होणाऱ्या नवीन रस्त्यांची कामे, तांदूळवाडी येथील पिण्याच्या पाण्याचा साठवण तलाव, येथे सुरु असणाऱ्या विकास कामांच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देत आवश्यक सूचना दिल्या.

अजित पवारांनी दिल्या या सूचना
– बारामतीच्या हवामानामध्ये ‍टिकून राहणाऱ्या देशी वृक्षांची लागवड करावी.
– आसपासचा परिसर सुशोभित करावा.
– कामाच्या ‍ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना प्रसन्न वाटावे अशा प्रकारचे वातावरण असावे.

यावेळी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील, बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी किरणराज यादव, विश्वास ओहोळ तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.