विप्रोच्या अझीम प्रेमजींनी टाटा, अंबानींना टाकले मागे; कोरोनासाठी दररोज देणार २२ कोटींची मदत

वर्षभरापासून आपला देश कोरोनाशी लढत आहे. आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण आला असून रुग्णांचे मोठे हाल होत आहेत. यामुळे अनेक दानशूर व्यक्ती मदतीसाठी पुढे येत आहेत. यामध्ये विप्रोचे संस्थापक अध्यक्ष अझीम प्रेमजींकडून कोरोना मदतीसाठी दररोज २२ कोटींची मदत जाहीर केली आहे.

विप्रोच्या अनेक संस्थांमार्फत ही मदत दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यामध्ये अझीम प्रेमजी फाऊंडेशनने एक हजार कोटी रुपये दिले. तसेच विप्रोने कोविड साथीमध्ये सर्व देशभर साथीच्या आजाराशी लढण्यासाठी १०० कोटी रुपये आणि विप्रो इंटरप्राईजेसने २५ कोटी रुपये दिले.

यामुळे आता मोठी मदत होणार आहे. देशभरात लॉकडाऊनमुळे सर्वकाही ठप्प झाले आहे. यातच सरकारची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. यामुळे अनेकजण मदतीसाठी पुढे येत आहेत.

सध्या रतन टाटा, मुकेश अंबानी, असे मोठे उद्योजक देखील मदतीसाठी पूढे येत आहेत. दुसऱ्या लाटेत रुग्णांना ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर देखील मिळत नाहीत. यामुळे टाटांनी परदेशातून ऑक्सिजन उपलब्ध केला आहे.

तसेच रिलायन्सकडून देखील मोफत ऑक्सिजन पुरवठा केला जात आहे. यामुळे अनेकांना दिलासा मिळाला आहे. यामुळे अझीम प्रेमजींनी केलेली मदत देखील अनेकांसाठी उपयोगी पडणार आहे.

ताज्या बातम्या

शाहरुख खानने माझ्या आयुष्याची वाट लावली; तरुणीचा शाहरुख खानवर खळबळजनक आरोप

कोरोनाच्या संकटात सिंघमने घेतला पुढाकार; रुग्णांच्या उपचारासाठी अजय देवगणने उभारले १ कोटी

‘हे’ मुस्लिम कलाकार हिंदू नाव लाऊन बाॅलीवूडमध्ये झाले प्रसिद्ध; नावे वाचून बसेल धक्का

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.