आयपीएल जिंकून सुद्धा रोहित शर्मा आहे नाराज, कारण…

मुंबई । नुकताच आयपीएलचा अंतिम सामना मुंबई विरुद्ध दिल्ली या संघात खेळला गेला. यामध्ये मुंबई इंडियन्सने बाजी मारत विजेतेपद पटकवले. दिल्ली कॅपिटल्सवर सहजरित्या मुंबई इंडियन्सने विजय मिळवला.

सामना सुरू असताना एक वेगळाच अनुभव बघायला मिळाला. मुंबईची फलंदाजी सुरु असताना रोहित शर्मा चांगल्या फॉर्ममध्ये खेळत होता. मात्र एका शॉर्टवर रोहित व सूर्यकुमार यादव यांच्यात ताळमेळ चुकला. मात्र त्यावेळी रोहित शर्माची विकेट न घालवता सूर्यकुमारने स्वतःला रन आऊट करून घेतले.

यामुळे सुर्यकुमारचा मनाचा मोठीपणा अनुभवायला मिळाला. सूर्यकुमार यादवच्या या कार्याबद्दल रोहित शर्मा म्हणाला, या संपूर्ण पर्वात आमच्या बाजूने सर्व गोष्टी घडल्या असून त्यासाठी मी आनंदी आहे. विजयाची सवय लावून घ्यायला हवी असे मी सुरुवातीपासून म्हणत आलोय.

सूर्या ज्या फॉर्मामध्ये आहे, ते पाहता मला त्याच्यासाठी विकेट द्यायला हवी होती. त्याच्यासारखी फटकेबाजी या पर्वात कुणीच केली नाहीये. तो आउट झाल्यावर वाईट वाटले, असेही यावेळी रोहित शर्मा म्हणाला.

सर्व खेळाडू अविश्वासातील असून आणि त्यांच्याकडून यापेक्षा अधिक मी काही मागूच शकत नाही, कॅप्टन म्हणून मी कधी कोणावर कोणतेही बंधन आणत नाही, असेही रोहित शर्मा यावेळी म्हणाला. सूर्या ज्या फॉर्मामध्ये आहे, ते पाहता मला त्याच्यासाठी विकेट द्यायला हवी होती. त्याच्यासारखी फटकेबाजी या पर्वात कुणीच केली नाहीये.

अंतिम सामन्यात घडलेल्या या प्रकारामुळे रोहित शर्मा नाराज झाला. मात्र मुंबईने हा सामना सहज जिंकला. यामुळे रोहित शर्माचे कौतुक केले जात आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.