याला म्हणतात मद्यप्रेमी! दारुची दुकान उघडल्याने बाटलीची दिवा लावून केली पुजा आणि नंतर…; पहा व्हिडिओ

देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले होते, पण आता कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. त्यामुळे वेगवेगळ्या राज्यातील निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व दुकाने उघडण्यात आली आहे.

तामिळनाडूत पण निर्बंध शिथिल करण्यात आली असून राज्य सरकारने तिथल्या दारुच्या दुकान उघडण्यात परवानगी दिली आहे. दारु दुकाने उघडल्याने मद्यप्रेमींचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. तर आता दुकानांमधली गर्दी पण वाढली आहे.

अशात याच्याशीच संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर खुप व्हायरल होत आहे. त्यामध्ये दारुची दुकान उघडल्यामुळे भलताच आनंदी झालेला दिसत आहे. त्यामुळे त्याने दारु दुकानाच्या बाहेर दिवा लावला आहे.

इतकेच नाही, तर दोन दारुच्या बाटल्या घेऊन त्या बाटल्यांना नमस्कार करत त्यांची पुजा केली आहे. त्यानंतर त्याने दारु पिली आहे. त्याला बघून दुसरा व्यक्ती तिथे आला आणि त्याने पण दारुच्या बॉटलची पुजा करण्यास सुरुवात केली आहे.

हा व्हिडिओ न्युज एजेन्सी एएनआयने ट्विट करत शेअर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तामिळनाडूमध्ये ३५ जवळपास २७ जिल्ह्यांमध्ये सलून, पार्क आणि दारुची दुकाने १४ जूनला उघडली आहे.

दरम्यान, २१ जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची पण घोषणा केली आहे. या काळात धार्मिक आणि पर्यटन स्थळ बंद राहणार आहे. तसेच या काळात सार्वजनिक आणि खाजगी बस सेवा स्थगित करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या-

कोण आहेत ते तुषार भोसले? अजित पवार यांनी भाजपच्या वारकरी नेत्याला सुनावले
खुशखबर! खाद्यतेल दोन दिवसानंतर ५० रुपये लीटरपर्यंत स्वस्त होणार, वाचा सविस्तर..
ब्रेकिंग! भाजप खासदार नारायण राणे दिल्लीत, केंद्रात मंत्रीपद मिळण्याची शक्यता

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.