आता राज्यात किराणा दुकानातही मिळणार वाईन, शरद पवारांची ईच्छा उद्धव ठाकरे करणार पूर्ण

मुंबई । वाइन विक्रेत्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय राज्य सरकार घेण्याची शक्यता आहे. राज्यातल्या द्राक्ष उत्पादकांकडून मोठ्या प्रमाणावर उत्पादित केल्या जात असलेल्या वाइनचा खप वाढावा म्हणून राज्य सरकारने एक विशेष धोरण तयार केले आहे. त्याबद्दलची अधिसूचना ऑगस्ट महिन्यात प्रसिद्ध केली जाण्याची शक्यता आहे.

आतापर्यंत राज्यातल्या वाइनवर आकारले जात नसलेले उत्पादन शुल्क आता १० टक्के दराने आकारले जावे, असा प्रस्ताव या धोरणात ठेवण्यात आला आहे. तसेच, आतापर्यंत केवळ वायनरीमध्येच उघडता येत असलेली वाइनची रिटेल आउटलेट आता स्वतंत्रपणेही सुरू करता यावीत, असाही प्रस्ताव या धोरणात ठेवण्यात आला आहे.

हे धोरण अंमलात आले, तर डिपार्टमेंटल स्टोअर्स, तसेच सुपरमार्केट्समध्येही स्वतंत्र विभाग करून वाइनची विक्री करता येणे देखील शक्य होणार आहे. २००५ साली तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवारयांनी वाइनचे वर्गीकरण मद्य म्हणून केले जात असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती.

तसेच, वाइन किराणा दुकानांतही उपलब्ध होण्याच्या बाजूने मत व्यक्त केले होते. वाइनला दारू समजले जात असल्यामुळे आतापर्यंत वाइनवर उत्पादन शुल्क आकारले जात नसूनही तिचा खप मात्र त्या उद्योगासाठी समाधानकारक नाही.

२०२०-२०१ची आकडेवारी पाहिली, तर देशात उत्पादित झालेल्या परदेशी मद्याची विक्री २०० दशलक्ष लिटर एवढी झाली. देशी दारूची विक्री ३२० दशलक्ष लिटर, बीअरची ३० कोटी लिटर, तर वाइनची केवळ सात लाख लिटर एवढीच विक्री झाली. हे धोरण अमलात आले तर वाईन विक्री करणार्‍यांचे भरपूर प्रमाणात फायदे होणार आहेत.

ताज्या बातम्या

मोठी बातमी! आत्महत्येपूर्वी पूजा चव्हाण संजय राठोडांशी ९० मिनिटं बोलली, धक्कादायक माहिती उघड

महसूल दिनानिमित्त मोठ्या बदलांची घोषणा, जमिनीच्या खोट्या नोंदी बंद, जाणून घ्या नवीन बदल..

राज्य सरकारचा मोठा निर्णय! आजपासून नवा सातबारा, जमिनीच्या खोट्या नोंदी करता येणार नाही

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.