Raj Thackeray : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांच्यातील पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चांवर आता राज ठाकरेंचे(Raj Thackeray) मामा चंदूमामा(Chandumama) यांनी भावनिक आणि सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं, “मी दोघांचेही वक्तव्य ऐकले, मला अत्यंत आनंद झाला. जर हे दोघं पुन्हा एकत्र येत असतील तर ‘लेट बेटर दैन नेव्हर’ – झालं गेलं गंगेला मिळालं.”
“उद्धव ठाकरेंच्या अटींना पर्याय आहेत, आपण शुभ बोलूया”
चंदूमामांनी सांगितलं की, “उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी काही अटी शर्ती मांडलेल्या असतील, तरी त्यालाही पर्याय असतो. आपण शुभ बोलूया आणि महाराष्ट्रासाठी चांगले दिवस येतील, अशीच तुळजाभवानी चरणी प्रार्थना.”
“राजकारणाच्या खोळात न जाता, मराठी माणसाच्या हिताचं पाहणं महत्त्वाचं”
ते पुढे म्हणाले, “दोघेही माझे भाचे आहेत. कोण मुख्यमंत्री होईल हे मला महत्त्वाचं वाटत नाही. पण जर त्यांची युती झाली तर महाराष्ट्रात मराठी माणसाच्या हितासाठी नक्कीच चांगले दिवस येतील.”
“समज-गैरसमज बाजूला ठेवून एकत्र यावं”
“*युती का होत नाही यामागे समज-गैरसमज आहेत. पण जर आज हे दोघं चिल्लर गोष्टी बाजूला ठेवून पुढे येण्यास तयार असतील, तर तेच योग्य आहे.* साहेब (बाळासाहेब ठाकरे) यांना यामुळं निश्चितच शांती मिळेल,” असं चंदूमामा म्हणाले.
“मामाला भाच्यांचं भांडण आवडत नाही”
आपल्या भावनांना वाट मोकळी करून देताना त्यांनी स्पष्ट केलं, “*दोन भाचे भांडत असतील तर कुठल्याही मामाला ते पाहणं नकोसं वाटतं. काही गोष्टी शब्दांत सांगता येत नाहीत, त्या बॉडी लँग्वेजमध्ये दिसून येतात.*”
“माझ्या आठवणींमध्ये साहेबांचं प्रेम अढळ”
चंदूमामांनी आपल्या आठवणींनाही उजाळा दिला. “*माझ्या पुस्तकात नवे बॉम्ब नसतील, पण इतिहास नक्कीच असेल. साहेबांनी किती प्रेम दिलं ते मी प्रत्यक्ष अनुभवलं आहे. माझ्या लग्नाचं उदाहरण घ्या – मी दाक्षिणात्य मुलीशी लग्न केलं तेव्हा ‘हटाव लुंगी’ आंदोलन सुरू होतं, पण साहेबांनी पाठिंबा दिला.* हेच मोठेपण होतं,” असं ते म्हणाले.
राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर चंदूमामांचं हे वक्तव्य केवळ भावनिक नाही, तर एकप्रकारची सार्वजनिक सादही आहे – की राज आणि उद्धव पुन्हा एकत्र यावेत, आणि महाराष्ट्राच्या हितासाठी हातात हात घालावा.
will-uddhav-thackeray-raj-thackeray-come-together-uncle-said-he-got-good-news