Share

Uddhav Thackeray : ‘त्या’ मुद्द्यावर उद्धव ठाकरे महाराष्ट्र सैनिकांची माफी मागणार का?’ युतीच्या चर्चा सुरू असताना मनसे नेत्याचा सवाल

Uddhav Thackeray : महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरे(Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीची जोरदार चर्चा सुरू असताना, मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे(Sandeep Deshpande) यांनी या विषयावर स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडली आहे. राजकीय एकत्रिततेच्या पार्श्वभूमीवर देशपांडेंनी ठाकरे गटावर टीकेची झोड उठवत काही तिखट सवाल उपस्थित केले आहेत.

देशपांडे(Sandeep Deshpande) म्हणाले, “भोंग्यांच्या आंदोलनावेळी महाराष्ट्र सैनिकांवर दाखल झालेल्या १७ हजार केसेसचं काय? उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) मुख्यमंत्री असताना आम्ही आंदोलन करत होतो, त्यावेळी आमच्यावर खटले लावले गेले, आता त्यावर चर्चा होणार का?” त्यांनी स्पष्ट केलं की, हे फक्त युतीचं राजकारण नसून, मराठी माणसाच्या हक्कांची लढाई आहे.

राज ठाकरेंच्या(Raj Thackeray) मुलाखतीचा उल्लेख करत देशपांडे(Sandeep Deshpande) म्हणाले, “राजसाहेबांनी जसा तामिळनाडूच्या उदाहरणाचा उल्लेख केला, तसंच महाराष्ट्रातही मराठी भाषेच्या, उद्योगांच्या आणि स्थानिक प्रश्नांवर सगळे एकत्र येणं गरजेचं आहे.”

२०१७ मधील घडामोडींचा संदर्भ देत देशपांडे म्हणाले, “त्या काळात शिवसेना-मनसे एकत्र यावं म्हणून प्रयत्न झाले होते. बाळा नांदगावकर मातोश्रीवर गेले होते, पण उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी त्यांना भेटणं टाळलं. नंतर फोनही उचलले गेले नाहीत. त्यामुळे याआधी युतीच्या प्रयत्नांना जेव्हा धोका दिला गेला, त्याची जाणीव आहे.”

तसेच, निवडणुका हे केवळ जागा वाटप, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री पदाच्या वाटाघाटीपुरते मर्यादित नसावं, असं सांगताना देशपांडे म्हणाले, “राजसाहेबांचा दृष्टिकोन व्यापक आहे. त्यांनी निवडणुकीपेक्षा मराठी अस्मिता, भाषा आणि उद्योग वाचवण्यावर लक्ष केंद्रित केलं आहे.”

ते पुढे म्हणाले, “मागचं विसरून पुढे जाणं आवश्यक आहे, पण त्याआधी जे झालं त्यावर खुली चर्चा व्हायला हवी. सध्या आम्ही हिंदी विरोधात आंदोलन करत आहोत, त्याला उद्धव ठाकरेंनी(Uddhav Thackeray) पाठिंबा द्यावा. ही संपूर्ण घडामोड फक्त दोन पक्षांच्या युतीपुरती मर्यादित न ठेवता, मराठी हितासाठी पाहायला हवी.”

राजकीय चर्चांमध्ये रंगत असली तरी देशपांडे यांच्या भूमिकेतून एक गोष्ट स्पष्ट होते – युतीपेक्षा महत्त्वाचं आहे मराठी माणसाचं हित, आणि त्यासाठी खरे प्रश्न मांडणं आवश्यक आहे.
will-uddhav-thackeray-apologize-to-maharashtra-soldiers

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now