लॉकडाउन होणार का? पुण्यातील संभाव्य कडक लॉकडाऊनबाबत महापौरांनी केली भूमिका स्पष्ट

मुंबई : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने शिखर गाठलं आहे आणि सर्वाधिक धोका महाराष्ट्रातच आहे. याच पार्श्वभूमीवर लॉकडाउन लागणार का? १ एप्रिलपासून नवीन निर्बंध काय असतील याबाबत स्पष्ट आदेश केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केले आहेत.

तर दुसरीकडे पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुणे शहरातील संभाव्य कडक लॉकडाऊनला विरोध केला आहे. परिस्थिती सुधारली नाही तर लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाऊ शकतो, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले होते.

याबाबत प्रतिक्रिया देताना मुरलीधर मोहोळ यांनी म्हटले आहे की, ‘सद्यस्थितीत संपूर्ण लॉकडाऊन करण्यात येऊ नये. हवं तर निर्बंध आणखी कडक करा, पण लॉकडाऊनचा निर्णय घेऊ नका,’ अशी विनंती मुरलीधर मोहोळ यांनी केली आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात काही ठिकाणी कोरोनाचा उद्रेक दिसून येतो आहे. पुणे, मुंबई, नागपूर, अमरावती शहरांमध्ये कोरोनाची उच्चांकी संख्या नोंदली गेल्याने गरज पडल्यास लॉकडाउनचा पर्याय विचारात घेऊ असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं होतं.

आता केंद्रानेही त्याला हिरवा कंदिल दाखवला आहे. स्थानिक पातळीवर कोरोनारुग्णांची संख्या लक्षात घेत कंटेन्मेंट झोन ते लॉकडाउनचा अधिकार राज्यांना देण्यात आला आहे. गेल्या वर्षीच्या लॉकडाउनमध्ये आंतरजिल्हा आणि जिल्ह्यांतर्गत वाहतुकीवरही निर्बंध घालण्यात आले होते.

अत्यावश्यक सेवा वगळता अन्य वाहतूक बंद होती. आता मात्र कुठल्याही परिस्थितीत प्रवासाचे निर्बंध नसतील, असे केंद्राने जाहीर केलं आहे. जिल्हाबंदी नसेल, राज्या राज्यांमधली प्रवासी वाहतूकही सुरू राहील, हे स्पष्ट करण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

‘सत्ता गेल्यामुळे फडणवीसांचे मानसिक संतूलन ढळले, ते अत्यंत अहंकारी, लबाड व दगलबाद’

माजी पोलीस अधिकाऱ्याने गंभीर आरोप केलेले ते बंटी बबली म्हणजे फडणवीस आणि रश्मी शुक्ला?

काँग्रेसनेच केला शिवसेनेवर ८०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप; राजकीय वर्तुळात उडाली खळबळ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.