आज वर्षातले तिसरे चंद्रग्रहण भारतातून दिसणार का?… जाणून घ्या पूर्ण माहिती

मुंबई | आज आषाढी पौर्णिमेच्या दिवशी तिसरे चंद्रग्रहण होणार आहे. हे उपछाया चंद्रग्रहण असणार आहे. मात्र हे चंद्रग्रहण भारतातून दिसणार का? असे अनेक प्रश्न सर्वांच्या मनात निर्माण झाले असतील. तर जाणून घ्या कुठे दिसेल हे चंद्रग्रहण.

यावर्षी एका महिन्यात तीन ग्रहांचा योग आला आहे. त्यापैकी दोन ग्रहण हे भारतात दिसले होते. मात्र हे चंद्रग्रहण भारतातून दिसणार नाही.

हे चंद्रग्रहण उत्तर पूर्व भाग सोडून आफ्रिका, यूरोपचा दक्षिण-पश्चिम भाग, अंटार्क्टिका, उत्तर भाग सोडून अमेरिका, न्यूझीलंड इथे दिसणार आहे.

सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका ओळीत असतात तेव्हा साधारण चंद्रग्रहण होते. मात्र चंद्राचा एकच भाग यावेळी लपवला जातो तेव्हा त्याला अर्ध चंद्रग्रहण असे म्हटलं जाते.

चंद्रग्रहण सुरू होण्यापूर्वी चंद्र पृथ्वीच्या सावलीत प्रवेश करतो. पण असे न करता चंद्र बाहेर पडतो तेव्हा त्याला उपछाया चंद्रग्रहण म्हणतात.

या ग्रहणात कोणतेही सुतक पाळले जात नाही. त्यामुळे मंदिर, अथवा पूजेसाठी प्रतिबंध घालण्यात येणार नाहीत. म्हणजे कोणत्याही प्रकारच्या शुभ कार्याला मनाई केली जाणार नाही.

हे चंद्रग्रहण ५ जुलै रोजी म्हणजेच आज होईल. भारत, अमेरिका, युरोप आणि ऑस्ट्रेलियासह दक्षिण आशियाच्या काही भागात ते दृष्य पाहण्यास मिळेल.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.