पुढील एक महिना संप चालूच राहणार? आता पुढील सुनावणी २० डिसेंबरला; वाचा कोर्टात काय घडले..

राज्यात अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी संपाबाबत आज मुंबई उच्च न्यायालयात महत्वाची सुनावणी पार पडली. त्यावर अजूनही कोणताही तोडगा निघालेला नाही. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी २० डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. २० डिसेंबरला या प्रकरणात सुनावणी होणार आहे.

यावर राज्य सरकार आणि एसटी कर्मचारी संघटना यांच्यामध्ये झालेल्या बैठकीतही काहीच तोडगा निघाला नाही. त्यामुळे हा संप आता महिनाभर चालू राहणार असल्याचे चित्र दिसत आहे. न्यायालयात आज एसटी संपाबाबत सुनावणी पार पडली. त्यावेळी न्यायालयाने विचारले की, कोरोनाकाळात बंद असलेल्या शाळा आता सुरू झाल्या आहेत.

यावेळी खेडेगावातील विद्यार्थ्यांनी काय करायचं? न्यायालयाने पुढे सांगितलं की, एसटी कामगारांनी संप सुरू ठेवताना विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचं नुकसान होतंय याचाही विचार करावा. राज्य सरकारने न्यायालयात सांगितलं की, संपकाळात कामावर येऊ इच्छिणाऱ्या कामगारांना संपकऱ्यांकडू आडकाठी केली जात आहे.

अशी घटना घडल्याचं संपकरी कामगार संघटनेने नाकारलं आहे. आता यावर पुढच्या महिन्यात २० तारखेला सुनावणी होणार आहे. दरम्यान, ऍड. गुणरत्न सदावर्ते यांनी असा धक्कादायक दावा केला आहे की, एसटी संपात नक्षलवादी चळवळीचा शिरकाव झाला आहे.

महामंडळाची संपाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल आहे. या याचिकेवरील आजच्या सुनावणीदरम्यान गुणरत्न सदावर्ते यांनी हा दावा केला आहे. पुढे गुणरत्न सदावर्ते न्यायाधीशांना म्हणाले की, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात नक्षलवादी चळवळ घुसली आहे. त्यामुळे या गोष्टीची दखल तातडीने घ्या आणि तुम्ही या गोष्टीची माहिती तातडीने पोलिसांना द्या.

आजच्या सुनावणीत सरकारकडून आपली बाजू मांडण्यात आली. सरकार म्हणाले की, प्रत्येक संपकरी संघटना स्वतंत्रपणे समितीसमोर आपली बाजू मांडणार आहेत. २० डिसेंबरला सुनावणी होणार असल्याने तोपर्यंत संप चालू राहणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. आता यावर काय निकाल येतो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

महत्वाच्या बातम्या
आनंद गिरीने गुरू नरेंद्र गिरींना फोनवर दिली होती धमकी, तुमचा ‘तो’ व्हिडिओ जर लोकांना दाखवला तर…
मुंबई पोलीसांकडून माझ्या जीवाला धोका म्हणून मी लपून बसलोय; परमबीरसिंगांची कोर्टात माहिती
ज्ञानदेव वानखेडेंना मोठा धक्का! नवाब मलिकांबाबतची ‘ती’ मागणी न्यायालयाने फेटाळली
..त्यामुळे आपले पाय जमिनीवरच ठेवा, राहुल द्रविडचा भारतीय संघातील खेळाडूंना सल्ला

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.