संभाजीराजे छत्रपती यांचा राज्यसभेचा कार्यकाळ आज संपणार आहे. त्यामुळे खासदार संभाजीराजे छत्रपती सध्या दिल्लीत आहेत. कार्यकाळ संपल्यानंतर पुढील भूमिका काय असणार आहे? याबाबतचा खुलासा खासदार संभाजीराजे छत्रपती ६ मे नंतर करणार आहेत. पुण्यात(Pune) पत्रकार परिषद घेऊन संभाजीराजे छत्रपती यासंदर्भात माहिती देणार आहेत.(Will Chhatrapati Sambhaji Raje form a new party? A big announcement will be made in Pune on this date)
“पुढे काय करायचं हे माझ्या डोक्यात ठरलेलं आहे. पत्रकार परिषद घेऊन नंतर मी ते जाहीर करणार आहे”, असे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितलं आहे. त्यामुळे संभाजीराजे छत्रपती नवीन पक्ष स्थापन करणार का? असा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला पडला आहे. या प्रश्नाचं उत्तर ६ मे नंतर महाराष्ट्रातील जनतेला मिळणार आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची महाराष्ट्रदिनी औरंगाबादमध्ये सभा झाली. या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याबाबत आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारला ४ तारखेपर्यंतच अल्टिमेटम दिलं आहे. औरंगाबादमधील सभेत राज ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावरील समाधीबाबत देखील विधान केलं होतं.
छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी लोकमान्य टिळकांनी बांधली, असं विधान राज ठाकरे यांनी औरंगाबादमधील सभेत केलं होतं. यावर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “इतिहास पूर्णपणे माहित असेल तरच बोलावं नाही तर अशा विषयांना हात लावू नये”, असा खोचक टोला खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राज ठाकरेंना लगावला आहे.
खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिल्लीमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी राज ठाकरेंच्या सभेतील विधानाचा खरपूस समाचार घेतला. “छत्रपतींचा वंशज या नात्याने मी अधिकृत सांगू इच्छितो की शिवरायांची समाधी लोकमान्य टिळक यांच्याकडून बांधली गेली नाही”, असे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले आहे.
राज ठाकरे यांनी औरंगाबादमधील सभेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीबाबत केलेल्या विधानानंतर महाराष्ट्रातील राजकारण तापलं आहे. अनेक इतिहासकारांनी राज ठाकरे यांचा हा दावा खोडून काढला आहे. “टिळकांना राजकारणात ओढलं जातंय. कोणत्याही पुराव्याशिवाय लोक काहीही बोलत आहेत. शिवरायांची समाधी बांधल्याचा टिळक कुटुंबीयांचा दावा नाही”, असे लोकमान्य टिळकांचे पणतू कुणाल टिळक यांनी स्पष्ट केले आहे.
महत्वाच्या बातम्या :-
लाऊडस्पिकर आणि झेंड्यावरून राडा; जाळपोळ आणि दुफान दगडफेक; हिंसाचारात नागरीक जखमी
भोजपुरी अभिनेत्रीने धरला चंद्रा लावणीवर ठेका, मराठमोळ्या सौंदर्याने पाडली चाहत्यांना भुरळ
पंतप्रधान मोदींचा कॉंग्रेसवर हल्लाबोल; “तो कोणता पंजा होता जो 1 रुपयातून 85 पैसे घासून घेत होता”